Video : “10 ला दोन लिंब घेताय की, करू शरद पवारांना फोन?”, शेतकऱ्याने गाण्यातून मांडली कैफियत, व्हीडिओ व्हायरल…

हा व्हीडिओ सध्या अनेकांच्या कुतुहलाचा विषय बनला आहे. अनेकांनी हा व्हीडिओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. शेतकरी जगला तर भारत टिकेल, अश्या कमेंट यावर पाहायला मिळत आहेत

Video : 10 ला दोन लिंब घेताय की, करू शरद पवारांना फोन?, शेतकऱ्याने गाण्यातून मांडली कैफियत, व्हीडिओ व्हायरल...
| Updated on: May 23, 2022 | 3:45 PM

मुंबई : सध्या उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे लिंबाची मागणी वाढली आहे. अश्यात एक व्हीडिओ सध्या सोशल मीडिया व्हायरल (viral video) होत आहे. या व्हीडिओत एक शेतकरी लिंब विकताना दिसतोय. पण या शेतकऱ्याची स्टाईल जरा हटके आहे त्यामुळे हा शेतकरी चर्चेत आला आहे. सोलापूरच्या (Solapur) वैराग गावच्या बाजारातील हा व्हीडिओ आहे. यात तो 10 रूपयांना लिंबू घेताय की करू शरद पवारांना फोन असं म्हणत आहे.

व्हायरल व्हीडिओ

एक व्हीडिओ सध्या सोशल मीडिया व्हायरल होत आहे. या व्हीडिओत एक शेतकरी लिंब विकताना दिसतोय. पण या शेतकऱ्याची स्टाईल जरा हटके आहे त्यामुळे हा शेतकरी चर्चेत आला आहे. सोलापूरच्या वैराग गावच्या बाजारातील हा व्हीडिओ आहे. यात तो 10 रूपयांना लिंबू घेताय की करू शरद पवारांना फोन, असं म्हणत आहे. तसंच त्याने शेतकऱ्याची कैफियत देखील मांडली आहे. 10 एकर बागायती शेती असलेल्या शेतकऱ्याच्या पोराला लग्नासाठी कुणी मुलगी देत नाहीये, असं म्हणत त्याने शेतकऱ्याची व्यथा मांडली आहे. पुढे त्याने थेट हा विषय शरद पवारांशी जोडलाय. “लिंबू 10 रुपयांना दोन, घेतंय का कोण? का लावू शरद पवारांना फोन”, असं हा शेतकरी म्हणतोय. या व्हीडिओची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.

हा व्हीडिओ सध्या अनेकांच्या कुतुहलाचा विषय बनला आहे. अनेकांनी हा व्हीडिओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. शेतकरी जगला तर भारत टिकेल, अश्या कमेंट यावर पाहायला मिळत आहेत. तर एकजण म्हणतो, “अगदी सहमत आहे, सध्या सगळ्यांना केवळ नोकरीवाल्या मुलांसोबतच लग्न करायचंय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना मात्र त्रास होतोय.” तिसऱ्याने या शेतकऱ्याच्या क्रिएटिव्हीटीचं कौतुक केलं.