जगातील मोठ्या राजकीय नेत्याची Live झूम मिटींग’, अचानक पत्नी नग्न अवस्थेत दिसल्याने गदारोळ

संसदेच्या बैठकीत कोरोना नियंत्रण आणि उपाययोजनांची माहिती देत असतानाच अचानक त्यांची पत्नी अंघोळ करुन येताना या झूम मिटींगमध्ये दिसली. गेल्या महिन्यात ही घटना घडली होती. अजूनही या बैठकीची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.

जगातील मोठ्या  राजकीय नेत्याची Live झूम मिटींग', अचानक पत्नी नग्न अवस्थेत दिसल्याने गदारोळ

केपटाऊन : कोरोनामुळे जगभरातील बैठका आता झूमद्वारे (Zoom meeting) होत आहेत. या तंत्रज्ञानाने जशी घरबसल्या आपलं काम करण्याची सोय केलीय. तशीच यामुळे अनेक अप्रिय प्रसंगही घडले आहेत. असाच एक प्रसंग दक्षिण आफ्रिकेच्या संसदीय समितीचा सदस्य असलेल्या नेत्यावर बेतलाय. Xolile Ndevu असं या नेत्याचं नाव आहे. ते संसदेच्या बैठकीत कोरोना नियंत्रण आणि उपाययोजनांची माहिती देत असतानाच अचानक त्यांची पत्नी अंघोळ करुन येताना या झूम मिटींगमध्ये दिसली. यानंतर ही बैठकच स्थगित करण्याची नामुष्की आयोजकांवर आली. गेल्या महिन्यात ही घटना घडली होती. अजूनही या बैठकीची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. (South African leader Xolile Ndevu wife seen naked during live zoom meeting).

या झूम मिटींगमध्ये दक्षिण आफ्रिकेतील एकूण 23 मोठे नेते सहभागी झाले होते. यावेळी Xolile Ndevu बैठकीला उपस्थित असलेल्या नेत्यांसमोर पूर्व केपटाऊनमध्ये स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने कशाप्रकारे मदतकार्य सुरु आहे याची माहिती देत होते. ते बोलत असतानाच अचानक त्यांची पत्नी अंघोळ करुन बाथरुममधून नग्नावस्थेतच बाहेर आली. काही क्षण त्या या झूम मिटींमध्येही नग्न अवस्थेत दिसल्या. त्यामुळे संसदीय समितीच्या प्रमुखांनी तातडीने हस्तक्षेप करत बैठक स्थगित केली आणि या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. ही घटना 30 मार्च रोजी कोविड 19 वरील झूम बैठकीदरम्यान घडलीय. यानंतर या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

‘आम्हाला कॅमेरात सर्वकाही दिसत आहे, हे विचलित करणारं आहे’

समितीच्या प्रमुख म्हणाल्या, “तुमच्या मागे असलेल्या व्यक्तीने योग्य प्रकारे कपडे घातलेले नाही. आम्हाला कॅमेरात सर्वकाही दिसत आहे. तुम्ही त्यांना मिटिंमध्ये असल्याचं सांगितलं आहे का? आम्हाला जे दिसलंय ते विचलित करणारं आहे. हा काही पहिला प्रसंग नाही. याआधीही तुमच्याशी बोलताना असा घटना घडल्या आहेत आणि असे प्रसंग पाहायला मिळाले आहेत. तुम्ही लाईव्ह टीव्हीवर आहात.”

‘झूम तंत्रज्ञान आमच्यासाठी नवं, त्याचं प्रशिक्षण नाही आणि घरही लहान’

यानंतर Xolile Ndevu यांनाही संकोच झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी चेहऱ्यावर हात ठेवत उपस्थितांची माफी मागितली. तसेच माझं लक्ष कॅमेराकडे होतं मागे काय सुरु आहे, कोण आहे याकडे नव्हतं असं म्हटलं. दुसऱ्या दिवशी माध्यमांशी बोलताना Xolile Ndevu म्हणाले, “झूम हे तंत्रज्ञान आमच्यासाठी फार नवं आहे. यासाठी आमचं प्रशिक्षण झालेलं नाही. माझं घरं लहान आहे त्यामुळे या बैठकीला स्वतंत्र खोलीची व्यवस्था नव्हती. याशिवाय ही बैठक 10 वाजता संपणार होती. मात्र, ती 10 वाजल्यानंतरही सुरु होती. त्याचवेळी माझी पत्नी बाथरुमधून आली. तिला मी कॅमेरावर काम करत असल्याची कल्पना नव्हती.”

हेही वाचा :

TikTok की Facebook? 2020 मध्ये सर्वाधिक डाऊनलोड केलेलं अ‍ॅप कोणतं?

‘झूम’ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अॅप सुरक्षित नाही, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून धोक्याचा इशारा

South African leader Xolile Ndevu wife seen naked during live zoom meeting

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI