जगातलं एकमेव आंब्याचं झाड ज्याला लागतात 300 प्रकारचे आंबे! ऐकलीये का मँगो मॅन ऑफ द वर्ल्ड ची कहाणी?

या आंब्याच्या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे या एका झाडावर सुमारे 300 प्रकारचे आंबे पिकवले जातात. बरं आता तुम्ही म्हणाल आंबे पिकणे ही काय फार मोठी गोष्ट नाही. पण हे वाक्य नीट वाचा या झाडावर जे 300 आंबे पिकवले जातात ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत.

जगातलं एकमेव आंब्याचं झाड ज्याला लागतात 300 प्रकारचे आंबे! ऐकलीये का मँगो मॅन ऑफ द वर्ल्ड ची कहाणी?
haji kalim ullah khan
Follow us
| Updated on: May 12, 2023 | 10:59 AM

लखनौ: उत्तर प्रदेशची राजधानी आणि नवाबांची नगरी लखनौ जगभर प्रसिद्ध आहे. आता आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहोत जी तुम्हाला माहित नाही. लखनौ या शहरात एक अनोखे आंब्याचे झाड आहे ज्याची खूप चर्चा आहे. या आंब्याच्या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे या एका झाडावर सुमारे 300 प्रकारचे आंबे पिकवले जातात. बरं आता तुम्ही म्हणाल आंबे पिकणे ही काय फार मोठी गोष्ट नाही. पण हे वाक्य नीट वाचा या झाडावर जे 300 आंबे पिकवले जातात ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. लखनौपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या मलिहाबाद चौकाजवळ हे झाड आहे.

लखनौ शहरातील रहिवासी हाजी कलीम उल्ला खान यांनी मोठ्या मेहनतीने एका झाडाचा शोध लावला, ज्यामुळे पाहणाऱ्या लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला. ग्राफ्टिंग तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी आंब्याच्या 300 जातींचा लागवड करणाऱ्या झाडाचा शोध लावला. या झाडाचे रहस्य जाणून घेण्यासाठी जपानच्या पथकानेही इथे भेट दिली आहे. या अनोख्या कार्याबद्दल हाजी कलीम यांना तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

मँगो मॅन ऑफ द वर्ल्ड

हाजी कलीम साहेबांनी वयाच्या 17 व्या वर्षी एका वनस्पतीचा शोध लावला, ज्यात सुमारे 7 प्रकारचे आंबे पिकवले गेले. इतकंच नाही तर हाजी कलीम साहेब आंब्यावर केलेल्या कामामुळे जगात मॅंगो मॅन म्हणूनही ओळखले जातात. या विचित्र झाडावर जे काही आंबे पिकवले जातात, ते विकले जात नाहीत तर लोकांमध्ये वाटले जातात. आंब्याचा हंगाम आला की या महिन्यात या झाडावर आंबेच आंबे असतात. हाजी कलीम साहेब म्हणतात की आंबा हे असे झाड आहे जे स्वतःच एक संपूर्ण कॉलेज आहे आणि त्यावर अभ्यास करण्याची गरज आहे.

हाजी कलीम यांचा दावा

हाजी कलीम साहेब म्हणतात की, आंब्याच्या झाडाचा नीट अभ्यास केला तर कॅन्सर आणि एड्ससारखे घातक आजारही बरे होऊ शकतात. मँगो मॅन ऑफ द वर्ल्ड म्हणून ओळखला जाणारा हा माणूस फक्त सातवीपर्यंत शिकला आहे आणि आज मोठे शास्त्रज्ञही त्याचा सल्ला घ्यायला येतात.

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.