रेल्वेचा अजब कारभार! चहा 20 रुपयांच्या आणि टॅक्स 50 रुपयांचा; आयआरसीटीसीचा टॅक्स इनव्हॉइस व्हायरल

वाढत्या महागाईसह सर्वत्र भरमसाठ कर आकारणी होत असल्याचा पुरावा म्हणजे हे इनव्हॉईस असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. 20 रुपयाच्या चहावर 50 रुपये म्हणजे प्रवाशांची लुट असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. भोपाळ शताब्दी ट्रेन मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाने हे टॅक्स इनव्हॉइस शेअर केले आहे. 

रेल्वेचा अजब कारभार! चहा 20 रुपयांच्या आणि टॅक्स 50 रुपयांचा; आयआरसीटीसीचा टॅक्स इनव्हॉइस व्हायरल
वनिता कांबळे

|

Jul 01, 2022 | 11:49 PM

दिल्ली :  रेल्वेच्या(Railway) अजब कारभाराचे अनेक नुमने आपण नेहमीच पाहत असतो. आता रेल्वेचा अनेक एक कारनामा समोर आला आहे. 20 रुपयांच्या चहावर(Tea) दुप्पट पेक्षा जास्त म्हणजे 50 रुपयांचा टॅक्स लावण्यात आला आहे. आयआरसीटीसीचा(IRCTC) हा टॅक्स इनव्हॉइस ( tax invoice) सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.

वाढत्या महागाईसह सर्वत्र भरमसाठ कर आकारणी होत असल्याचा पुरावा म्हणजे हे इनव्हॉईस असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. 20 रुपयाच्या चहावर 50 रुपये म्हणजे प्रवाशांची लुट असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. भोपाळ शताब्दी ट्रेन मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाने हे टॅक्स इनव्हॉइस शेअर केले आहे.

केंद्र सरकार आणि रेल्वे प्रशासनाच्या या कर आकारणीवर मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे. आयआरसीटीसीच्या नावावर हे  टॅक्स इनव्हॉइस आहे. यामध्ये 20 रुपयांच्या चहावर 50 रुपये सर्व्हिस चार्ज आकारल्याचे दिसत आहे. सध्या या व्हायरल टॅक्स इनव्हॉइसच्या फोटोवर अनेकजण कमेंट करत नाराजी व्यक्त करत आहेत.

या इनव्हॉइसचा तपशील पाहिला असता  एका चहाची किंमत 20 रुपये आहे. त्यावर 50 रुपये ‘सर्व्हिस चार्ज’ आकारण्यात आला आहे.  28 जून 2022 रोजी भोपाळ शताब्दी ट्रेनने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने हे इनव्हॉइस सोशल मिडीयावर शेअर केले आहे.

याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांनी देखील न पटण्यासारखे उत्तर दिले आहे. ग्राहकांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क वसूल करण्यात आलेले नसल्याचा दावा या अधिकाऱ्याने केला आहे. राजधानी किंवा शताब्दीसारख्या ट्रेनमध्ये रिझर्वेशन करताना प्रवासी जेवण बुक करत नाही, तर त्यांना प्रवासादरम्यान चहा, कॉफी किंवा जेवण ऑर्डर करतात त्यासाठी त्यांना 50 रुपये सर्व्हिस चार्ज भरावे लागतात. जर तुम्ही ट्रेनमध्ये 300 रुपयांमध्ये जेवण ऑर्डर केले असेल तरी तुम्हाला 350 रुपये द्यावे लागतील. त्याचबरोबर 20 रुपयाचा चहा मागवला तरी 50 रुपये सर्विस चार्ज भरावे लागतो असे स्पष्टीकरण या अधिकाऱ्याने दिले आहे.  यासंदर्भातील आदेश रेल्वे बोर्डाने 2018 मध्येही जारी केले असल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें