VIDEO | तेजस्वी यादवची क्रिकेटच्या मैदानात चौकार षटकारांची बरसात, सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ, पाहा लोकं काय म्हणाले…
सोशल मीडियावर बिहार राज्याचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.

बिहार – बिहार (Bihar) राज्याचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Bihar Deputy Chief Minister Tejashwi Yadav) मागच्या काही दिवसांपासून अधिक चर्चेत आहेत. विविध कारणामुळे ते चर्चेत असतात. सध्या ते क्रिकेटच्या मैदानातील (Cricket Ground) खेळीमुळे चर्चेत आले आहेत. मिळालेल्या वेळात क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री असताना सुध्दा त्यांचं क्रिकेट प्रेम अजिबात कमी झालेलं नाही. ज्यावेळी त्यांना मोकळा वेळ मिळतो, त्यावेळी ते क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियावर बिहार राज्याचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. बिहारच्या एका मैदानात ते काही युवा खेळाडूंसोबत क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे तेजस्वी यादव यांनी अधिकृत अकाऊंटवरती हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचबरोबर व्हिडीओ कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, बिहारच्या युवा आणि तगड्या खेळाडूंसोबत क्रिकेटची मजा घेत आहे.
Practising with young & bright players of Bihar. #Cricket
Love your passion Live your purpose pic.twitter.com/Q5S6j2YmGG
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) January 8, 2023
बिहार राज्याचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी ट्विटर जो व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओ अधिक लोकांनी लाईक केले आहे. 50 हजारपेक्षा अधिक लोकांनी तो व्हिडीओ पाहिला आहे. तेजस्वी यादव आयपीएलचा सुद्धा सदस्य राहिला आहे. आयपीएलमध्ये दिल्लीच्या टीमकडून त्यांना संधी देण्यात आली होती. तेजस्वी यादवला मधल्या फळीतील फलंदाज म्हटलं जातं.
