5

थायलंडच्या राजाचा थाटच न्यारा, 1400 आक्षेपार्ह फोटो लीक झालेल्या गर्लफ्रेण्डला केलं राणी

थायलंडच्या 68 वर्षीय राजाने वोंगवजिरापकडीला तिच्या 36 व्या वाढदिवशी मुकूट घालून राणी केलं. (Thailand King second queen)

थायलंडच्या राजाचा थाटच न्यारा, 1400 आक्षेपार्ह फोटो लीक झालेल्या गर्लफ्रेण्डला केलं राणी
Follow us
| Updated on: Jun 22, 2021 | 3:15 PM

बँकॉक : थायलंडचे (Thailand) राजा महा वजिरालोंगकोर्न (King Maha Vajiralongkorn) यांनी गर्लफ्रेंड सीनीत वोंगवजिरापकडी (Sineenat Wongvajirapakdi) हिला दुसरी राणी घोषित केलं. 68 वर्षीय राजाने वोंगवजिरापकडीला तिच्या 36 व्या वाढदिवशी मुकूट घालून राणी केलं. वोंगवजिरापकडीच्या वाढदिवशी राजधानी बँकॉकमध्ये बौद्ध परंपरेनुसार मासे आणि पक्ष्यांना मुक्त करण्यात आलं. विशेष म्हणजे वोंगवजिरापकडी सिंहासनावर बसण्याच्या काही दिवस आधीच त्यांचे 1400 न्यूड फोटो ऑनलाईन लीक झाले होते. (Thailand Playboy King Maha Vajiralongkorn makes Sineenat Wongvajirapakdi his second queen)

राजाच्या पहिल्या राणीवरच आरोप

कोई या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वोंगवजिरापकडीच्या लीक फोटोंमध्ये त्या नग्न किंवा अर्धनग्न अवस्थेत आहेत. या फोटोंमुळे थायलंडमध्ये मोठा वाद उफाळला होता. फोटो लीक झाल्यानंतर थायलंडमध्ये एकच गोंधळ उडाला. फोटो लीक होण्यामागे राजाची पत्नी सुथिडा यांचं नावही जोडलं गेलं. वोंगवजिरापकडी आणि सुथिडा यांच्यात राजावरुन हमरीतुमरी झाली होती. त्यानंतर सुथिडा यांनी फोटो लीक केल्याचा दावा केला जातो. मात्र अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

तुरुंगाबाहेर पडताच वोंगवजिरापकडीची मुकुटावर नजर

वोंगवजिरापकडी नुकतीच तुरुंगातून बाहेर पडली. त्यानंतर तिने राजाशी जवळीक साधण्याचे प्रयत्न पुन्हा सुरु केले. याच काळात तिचे फोटो लीक करण्यात आले. गेल्या वर्षी वोंगवजिरापकडीला अचानक तुरुंगात डांबलं होतं. राणीची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिच्यावर होता. मात्र आर्मी हॉस्पिटलची नर्स राहिलेल्या वोंगवजिरापकडीला तुरुंगातून सुटल्यानंतर पुन्हा एकदा राजेशाही दर्जा देण्यात आला आहे. (Thailand Playboy King Maha Vajiralongkorn makes Sineenat Wongvajirapakdi his second queen)

राजाला पाठवण्यासाठीच वोंगवजिरापकडीचे न्यूड्स?

‘द टाइम्स’ या इंग्रजी वर्तमानपत्राच्या रिपोर्टनुसार वोंगवजिरापकडीचे न्यूड फोटो तिने स्वतःच काढले आहेत. अज्ञात व्यक्तीने ते फोटो ब्रिटिश पत्रकार अँड्र्यू मॅकग्रेगर मार्शलला पाठवल्याचं बोललं जातं. मार्शल हे थायलंडच्या राजेशाहीविरोधात टीकात्मक लेख लिहिण्यासाठी ओळखले जातात. वोंगवजिरापकडीने राजाला पाठवण्याच्या इच्छेने हे फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढले असावेत, असं मार्शलने फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं होतं.

संबंधित बातम्या :

मजुराला मिळालं एवढं सोनं की अख्खं गाव झालं श्रीमंत, या शहराचं नाव वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल

महिलांच्या बेडरुममध्ये काय चाललंय हे पाहण्यासाठी तरुणाचं भयंकर कृत्य; वाचून तुम्हीही हादराल

(Thailand Playboy King Maha Vajiralongkorn makes Sineenat Wongvajirapakdi his second queen)

Non Stop LIVE Update
'आम्ही अपात्र होऊ अशी स्वप्ने बघणारे...' शिवसेना आमदाराने झापले
'आम्ही अपात्र होऊ अशी स्वप्ने बघणारे...' शिवसेना आमदाराने झापले
लोकसभेसाठी 'त्या' चार नावांची चर्चा, बावनकुळे म्हणतात...
लोकसभेसाठी 'त्या' चार नावांची चर्चा, बावनकुळे म्हणतात...
'महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक', महिला खासदारांची टीका
'महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक', महिला खासदारांची टीका
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?