AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हाला माहिती आहे 20 रुपयांच्या नोटेवरील सुंदर Beach चे रहस्य ?

तुम्ही कधी 20 रुपयांची जुनी नोट निरखून पाहिली आहे का ? या नोटेच्या मागे एक समुद्र किनाऱ्याचे दृश्य दिसते. पण तुम्हाला माहिती आहे ही जागा प्रत्यक्षात आहे, कुठे ते पाहूयात....

तुम्हाला माहिती आहे 20 रुपयांच्या नोटेवरील सुंदर Beach चे रहस्य ?
Rs 20 banknote photo
| Updated on: May 02, 2026 | 5:51 PM
Share

जुनी २० रुपयांच्या नोटेला तुम्ही अनेकदा पाहिले असेल, मात्र या नोटेच्या मागच्या बाजूच्या फोटोला कधी नीट लक्षपूर्वक पाहिले का ? हा फोटो एखाद्या सुंदर सीनरीचा वाटतो, एखाद्या समुद्री किनाऱ्याचे हे दृश्य वाटत होते. मात्र, वास्तविक हा फोटो भारतातील एका वास्तविक आणि खूपच सुंदर जागेचा फोटो आहे. या जागी तुम्ही स्वत: जाऊन हे दृश्य अनुभवू शकता. कोठे आहे हा सुंदर समुद्र किनारा…

जर तुमच्याकडे जुनी २० रुपयांची नोट असेल तर त्याला काढून या फोटोला नीट निरखून पाहा. या नोटेच्या मागे एक समुद्र किनारा आहे. ताडांची झाडे आणि एक लाईट हाऊस देखील आहे. हे कोणतेही काल्पनिक चित्र नसून खरोखरच ही जागा वास्तवात आहे. या जागेला ओळखण्याचा प्रयत्न एका कटेन्ट क्रिएटर सोनू सँडी याने केला आहे.

कोठे आहे ही जागा ?

सोनू सँडी या फोटोतील खऱ्या लोकेशनचा शोध घेत अंदमान आणि निकोबार बेटांचा समुह असलेल्या पोर्ट ब्लेअरला पोहचले. तेथून त्यांनी एक व्हिडीओ तयार केला आहे. आणि त्यांनी तेथील ही जागा युजरना दाखविली. व्हिडीओच्या सुरुवातीला ते पायऱ्या चढताना दिसत आहे. हे तेच ठिकाण आहे, जे २० रुपयांच्या नोटेवर छापलेले आहे, तोच समुद्र किनारा आणि ते लाईट हाऊस व्हिडीओत दिसते.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की हातात २० रुपयांची जुनी नोट सोनू घेताना दिसत आहेत. आणि त्याच्या मागील फोटो ते दाखवताना दिसत आहे. त्यानंतर कॅमेरा त्या लोकेशनवर खिळलेला दिसतो. हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटते की नोटेवर जो फोटो छापलेला आणि त्याचे वास्तविक दृश्य प्रत्यक्षात आहे. समुद्र किनाऱ्यावरील ताडाची झाडे आणि शेजारी उभे असलेले लाईट हाऊस सर्व काही नोटेवरील फोटो सारखेच..

या बेटाचे नाव काय ?

२० रुपयांच्या नोटेवरील खास ही जागा नॉर्थ बे आयलँडवर आहे. यास कोरल आयलँड म्हणूनही ओळखले जाते. हे सुंदर बेट अंदमान आणि निकोबार बेट समुहाचा एक भाग आहे. आणि ते पोर्ट ब्लेअर जवळ उभे आहे. येथील समुद्र निळाशार दिसतो. आणि पांढरी वाळू, हिरवा निसर्ग हे वातावरण पर्यटकांना अगदी मोहून टाकते.

नॉर्थ बे आयलँड खास करुन तेथील समुद्री जीवन आणि कोरल रीफ्ससाठी ओळखले जाते. येथे स्नॉर्कलिंग आणि स्कूबा डायव्हींग सारखे पर्यटकांना आवडते साहसी खेळ प्रकार आहेत. ज्यामुळे समुद्राच्या आतील सुंदर जीवन जवळून पाहायला मिळते. त्यामुळे ही जागा पर्यटकांची खास आवडती जागा असल्याने तिला भारताचा वारसा म्हणून नोटेवर स्थान मिळालेले आहे.

जुन्या २० रुपयांच्या नोटेवर जसा सुंदर बिचच्या फोटो आहे. तशा नव्या २० रुपयांच्या नोटेवर देखील भारताची एक ऐतिहासिक जागा दाखवण्यात आली आहे. नव्या नोटेच्या मागे एलोराच्या गुहा दाखवण्यात आल्या आहे. हे महाराष्ट्रातील एक जागतिक वारसा यादीतील पर्यटन स्थळ आहे. हा गुहा त्याच्या कोरीव काम आणि वास्तुकलेमुळे जगप्रसिद्ध आहेत.

येथे पाहा व्हिडीओ –

View this post on Instagram

A post shared by Sonu Sandy (@sonu_sandy25)

अशा प्रकारे भारतीय चलनी नोटा केवळ खरेदी – विक्री करण्याचे साधन नाहीत तर त्यातून देशाचा सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा देखील दर्शवण्यात आला आहे. नोटांवर छापलेले प्रत्येक फोटो हे एक कहानी सांगत आहेत. भारताच्या विविधतेची आणि सौदर्याची झलक दाखवत आहेत.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...