AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घोर कलियुग..कोंबडीने आपली समजून परक्याची अंडी उबवली, मग जे झालं ते चमत्कारीकच

आतापर्यंत कोकीळा आपल्या अंड्यांना उबवत नाही ती कावळ्याच्या घरट्यात अंडी आऊट सोर्सिंग करीत उबवायला ठेवते. परंतू आता या एका कोंबडीच्या बाबतीत मोठी फसवणूक झाली आहे.

घोर कलियुग..कोंबडीने आपली समजून परक्याची अंडी उबवली, मग जे झालं ते चमत्कारीकच
| Updated on: Jul 31, 2024 | 10:25 PM
Share

कलियुगात काय होईल हे सांगता येत नाही. आंध्राच्या अल्लुरीत एक अजब प्रकार घडला आहे. येथे एका कोंबडीबरोबर ‘खेला’ झाला आहे. कोंबडीने मोठ्या काळजीने ज्या अंड्यांना आपले समजून काळजी घेतली. त्यांना आठवडे उबवले त्या अंड्यांतून जेव्हा पिल्ले बाहेर आली ती काही वेगळ्याच रंगाची आणि आकाराची होती. या कोंबडीच्या अंड्यातून चक्क मोर आणि लांडोरीची पिल्ले निघाली आहेत. कोंबडी बिचारी आता या लांडोरीच्या पिल्लांना आपलीच पिल्ले समजून  त्यांचे  पालनपोषण करीत आहे.

हा अनोखा प्रकार अल्लूरी येथील आदिवासी विभागात घडला आहे.येथील एका आदिवासी रहिवाशाने काही कोंबड्या पाळल्या आहेत. तो तीन आठवड्यांपूर्वी जंगलात गेला होता. तेथे त्याला काही अंडी मिळाली. ती अंडी कोंबडीच्या अंड्यासारखी दिसत होती. म्हणून  त्याने ती सांभाळून घरी आणली. त्याने ती अंडी कोंबडीजवळ ठेवून दिली. कोंबडी या अंड्यांना तिचीच अंडी समजली. त्या बिचाऱ्या कोंबडीने इमाने इतबारे या परक्या अंड्यांना उबविण्याचे काम केले. कोंबडी त्या अंड्याची काळजी देखील घेऊ लागली. त्यानंतर अंडी बरोबर फलीत झाल्यानंतर अंड्यातून एक एक करुन कोंबडीच्या पिल्लासारखीच चिव चिव करणारी पिल्ले निघाली.  मात्र ही पिल्ले रंगरुपाने थोडी वेगळीच दिसत होती. सुरुवातीला मालकाने याकडे इतके लक्ष दिले नाही. परंतू या पिल्लांना जसजसे पंख येऊ लागले तसतसे या पिल्लांना पाहून ती कोंबडीची नसून  मोर-लांडोरीची असल्याचे स्पष्ट झाले. हे सर्व पाहून आता परिसरातील सर्वांचा हा विषय चर्चेचा झाला आहे.

कोंबडी – लांडोरीच्या पिल्लात अतूट प्रेम

इतके दिवस झाले तरी कोंबडी आपली पिल्ले समजून त्यांची काळजी घेत आहे. त्यांना दाणे कीटक कसे टिपावे हे शिकवत आहेत. लाडोंरीचे पिल्ले देखील तिलाच आपली आई समजत तिच्या मागे मागे पुढे फिरत आहेत. दिवस असो कि रात्र ही पिल्ले देखील कोंबडी सोबत राहात आहेत. परंतू ही बातमी पंचक्रोशीत पसरली तशी आता गावातून लोक या पिल्लांना आणि कोंबडीला पाहण्यासाठी येत आहेत.

कोंबडीचा मालक काय म्हणाला ?

मला माहिती नव्हते की मोर वा लाडोंरीची अंडी आहेत. मला वाटलं की ही अंडी जंगली कोंबडीची असतील, यासाठी मी ती घरी आणली. सुरुवातीला मी त्यांच्याकडे लक्ष्य नाही दिले. जेव्हा पिल्ले मोठी झाली तेव्हा माझे लक्षात आले की काही तरी वेगळे घडले आहे.

Follow Us
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case :प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान