स्वप्नासाठी कायपण! राहतं घर विकून जोडप्याने थाटला क्रूझवर संसार, वाचा सविस्तर…

स्वप्नासाठी कायपण! राहतं घर विकून जोडप्याने थाटला क्रूझवर संसार, वाचा सविस्तर...
राहतं घर विकून जोडप्याने थाटला क्रूझवर संसार

अमेरिकेतील सिएटल भागात राहणाऱ्या एका जोडप्याने आपलं राहातं घर सोडत जहाजावर राहण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी आपली नोकरी सोडली आणि जहाजावर पूर्णवेळ राहण्याचं ठरवलं. अँजेलिन आणि रिचर्ड बुर्क असं या दोघांचं नाव आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

May 15, 2022 | 11:08 AM

मुंबई : आपलं स्वप्नातलं घरं साकारण्यासाठी सगळेच जण प्रयत्न करत असतात. आपल्याला हवं तसं घर साकारण्यासाठी लोक आयुष्य वेचतात. पण आपल्या स्वप्नातलं घर विकून कुणी जहाजावर (Cruise) आपला संसार थाटल्याचं ऐकलंय का? असं कधी ऐकलं पाहिलं नसेल तर ही बातमी वाचा… कारण या जोडप्यावने चक्कस आपलं राहातं घर विकून जहाजावर संसार थाटलाय… याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा (Viral News) होतेय.

अमेरिकेतील सिएटल भागात राहणाऱ्या एका जोडप्याने आपलं राहातं घर सोडत जहाजावर राहण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी आपली नोकरी सोडली आणि जहाजावर पूर्णवेळ राहण्याचं ठरवलं. अँजेलिन आणि रिचर्ड बुर्क असं या दोघांचं नाव आहे. या जोडप्याला समुद्रपर्यटन फार आवडतं. यासाठी त्यांच्या लग्नावेळी त्यांनी एकमेकांना एक वचन दिलं होतं. वर्षातून किमान एकदा ते दोघे क्रूझने प्रवास करतील.

अँजेलिन आणि रिचर्ड बुर्क यांनी हे वचन निभावलं. पण मागच्यावर्षी या जोडप्याच्या मनात एक वेगळा विचार आला. त्यांनी आपलं काम सोडून पूर्णवेळ जहाहावर राहण्याबाबात गांभिर्याने विचार केला. त्यासाठी लागणाऱ्या खर्चाची जुळणी केली. अन् ते जहाजावर राहायला गेले.

एका व्यक्तीच्या पूर्ण दिवसाचा, राहण्याचा, खाण्याचा आणि वाहतुकीचा सरासरी खर्च थोडा जास्त आहे. जर त्यांनी लॉयल्टी मेंबरशिप वापरली आणि विक्रीच्या कालावधीत ती खरेदी केली, त्याची किंमत दिवसाला 42 डॉलर म्हणजेच 3250 रुपये इतकी असेल.

या निर्णयाबाबत तिने एका वृत्त वाहिनीला आपली मुलाखत दिली त्यात तिने “आम्हाला खरोखरच समुद्रपर्यटन खूप जास्त आवडतं. त्यासाठी आम्हाला जे लागेल ते करण्याची आमची तयारी असते. 1992 मध्ये कॅरिबियनमध्ये जाण्यासाठी मी पहिल्यांदा मेगा-शिपमध्ये बसली आणि तेव्हापासूनच मला समुद्रप्रवास आवडू लागला”, असं अँजेलिनने न्यूज वेबसाइट 7लाइफला सांगितलं.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें