AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कारचालकाने बाईकला घासत चार किलोमीटरपर्यंत घेऊन गेला, ठीणग्या उडत असल्याचा व्हीडीओ जारी

दुचाकीस्वाराला धडक मारल्यानंतर त्या दुचाकीस्वाराला काही लागले आहे का याची काहीही चौकशी न करता या कार चालकाने बाईक गाडीखाली अडकल्याचे माहीत असूनही त्या बाईकला इतक्या दूरपर्यंत घासत नेले की विचारता सोय नाय

कारचालकाने बाईकला घासत चार किलोमीटरपर्यंत घेऊन गेला, ठीणग्या उडत असल्याचा व्हीडीओ जारी
GURUGRAMImage Credit source: ANI
| Updated on: Feb 03, 2023 | 9:23 AM
Share

हरीयाणा : कार चालकांचे अनेक अपघात तुम्ही पाहीले असतील, परंतू अलिकडे आपल्या चारचाकी गाडीखाली अडकलेल्या बाईकना अगदी दूरपर्यंत घसटवत नेण्याचा नविन प्रघात रूजू झाला आहे. अपघात घडल्यानंतर आपण जखमी झालेल्या व्यक्तीला मदत करायचे सोडून असे माणूसकी नसलेले प्रकार वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अलिकडे असे माणूसकी शून्य प्रकार वाढत आहेत. अशा प्रकारे माणूसकीशून्य लोकांना कायद्याची कोणतीही भितीच उरलेली नसल्याचे स्पष्ठ होत आहे.

एका कारने दुचाकीस्वाराला धडक मारल्यानंतर त्या दुचाकीस्वाराला काही लागले आहे का याची काहीही चौकशी न करता या कार चालकाने त्याची बाईक गाडीखाली अडकल्याचे माहीत असूनही त्या बाईकला चक्क चार किमीपर्यंत घासत नेल्याचा भयानक व्हीडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे. हा व्हीडीओ पाहून अंगावर काटा येत आहे. अलिकडे असे माणूसकी शून्य प्रकार वाढत आहेत. अशा प्रकारे माणूसकीशून्य लोकांना कायद्याची कोणतीही भितीच उरलेली नसल्याचे स्पष्ठ होत आहे.

हरीयाणा येथील गुरुग्रामच्या सेक्टर-62 मध्ये ही घटना घडली आहे. भरधाव वेगात असलेल्या कारने दुचाकी धडक दिली त्यानंतर ही दुचाकी कारखाली अडकली. त्यामुळे घाबरलेल्या या कार चालकाने या दुचाकीला कार खालून न काढता थेट घटनास्थळावरून धूम ठोकली. आणि या दुचाकीला तब्बल चार किलोमीटरपर्यंत घासत नेले. हा कारचालक दारुच्या नशेत होता असे म्हटले जाते.

या मद्यधुंद कार चालकाने दुचाकी  रस्त्यावर घासताना बाईकमधून ठिणग्या बाहेर पडत होत्या. बेधडक कारचालक आपली गाडी तशीच चालवत खूपच दूर गेला. लोकांनी या गाडीचा पाठलाग करून ती थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार चालकाने त्याची पर्वा न करता कार चालवणे सुरूच ठेवले. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस कारचा शोध घेत आहेत. सीसीटीव्हीची त्यासाठी मदत घेतली जात आहे.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.