VIDEO: स्टंटगर्लने कचकन् ब्रेक दाबला, सायकलचे मागचे चाक वर, तेवढ्यात… काय घडले ते पाहून पोट धरून हसाल!

VIDEO: स्टंटगर्लने कचकन् ब्रेक दाबला, सायकलचे मागचे चाक वर, तेवढ्यात... काय घडले ते पाहून पोट धरून हसाल!
मुलीचा अप्रतिम स्टंट

स्टंट करण्यासाठी कुणी कुणी खूप मेहनत घेतं पण ऐनवेळी त्याचा व्हिडिओ सुरु असताना कुणाच्या तरी चुकीने तो बिघडतो. असा घडल्या-बिघडल्याचाच एक विनोदी व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Dec 12, 2021 | 3:04 PM

स्टंट (Stunt) करणं ही फार सोपी गोष्ट नसते. त्यासाठी खूप मेहनत लागते. खूप दिवसांचा सराव लागतो. तो सादर करण्याता आत्मविश्वास लागतो. एवढं करूनही फायनल स्टंटचा व्हिडिओ करताना काही पचका झाला तर तसाच्या तसा व्हिडिओ व्हायरलदेखील होऊ शकतो बरं का.. असाच एक स्टंटचा किंबहुना फिसकटलेल्या स्टंटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगी वेगाने सायकल चालवत येते आणि अचानक ब्रेक दाबते. तिचा हा स्टंट आपल्याला एकदम थक्क करणारा वाटतो, तेवढ्यात तिच्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी फेरले जाते.

सायकलचे चाक वर असतानाच आणखी एक सायकल अवतरते

 

View this post on Instagram

 

A post shared by Best Fails (@best.failsever)

या व्हिडिओमध्ये एका मुलीचा स्टंट चांगला झाला असतानाच आणखी एका सायकल चालक मुलाची एंट्री होते आणि सगळा प्लॅन फिसकटतो. मुलीच्या सायकलचे एक चाक वर असतानाच मागूनही आणखी एक सायकलवाला येतो. तो ब्रेक लावायलाच विसरतो आणि समोर उभ्या असलेल्या मुलीला वेगात टक्कर देतको. त्यानंतर दोघेही धाडकन् पडतात. अचानक झालेल्या या घटनेत मुलीच्या सायकलला काही होत नाही, पण बिचाऱ्या मुलाच्या सायकलचे दोन तुकडे होतात. असे असूनही शेवटी दोघेही पटकन् उठून उभे राहतात. नंतर काही घडलेच नाही असे दाखवतात.

सोशल मीडियावर व्हायरल

या विनोदी व्हिडिओ सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होत आहे. इन्स्टाग्रामवर या व्हिडिओला best.failsever नावाच्या आयडी द्वारे शेअर केले जात आहे. तसेच पुढे लिहिले आहे की, ”बाइक्सना ब्रेक नाही, हे स्वाभाविकच आहे..” या व्हिडिओला आतापर्यंत 2 लाख 84 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर असंख्य विनोदी प्रतिक्रियादेखील मिळाल्या आहेत. एका यूझरने तर लिहिलंय, त्याने तर मुलीच्या स्टंटवर पाणीच फेरले. तर दुसऱ्याने लिहिले, रस्ता एवढा रुंद आहे, पण मागून येणारा बाइकस्वार खरंच आंधळा असेल…

इतर बातम्या-

Sharad Pawar Birthday : शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या नेहरू सेंटरच्या कार्यक्रमात अजित पवार यांचं दाटलेल्या आवाजातल भाषण …

Sharad Pawar Birthday : ‘शरद पवार हे पॉवर हाऊस, त्यांचा नेम अचूक’


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें