पार्टनरचे शिक्षण, नोकरी, जात… अन् कुटुंबात सदस्य किती? लग्नातील अटींची यादी झाली व्हायरल

| Updated on: Oct 25, 2022 | 11:34 PM

अटींची मोठी यादी पाहून या सर्व अपेक्षा पूर्ण तरी कशा करणार? असा स्वाभाविक प्रश्न देखील अनेकांना पडला आहे.

पार्टनरचे शिक्षण, नोकरी, जात... अन् कुटुंबात सदस्य किती? लग्नातील अटींची यादी झाली व्हायरल
लग्नासाठीच्या अटींचा मॅसेज व्हायरल
Image Credit source: Social Media
Follow us on

लग्न (Marriage) म्हटलं की त्याआधी होणारी बोलणी तसेच अटींची चांगलीच चर्चा होते. दोन्हीकडील मंडळी आपापल्या अटी सांगून मोकळे होतात. यातील प्राथमिक गोष्टी म्हणजे मुलामुलीचे वय, शिक्षण, नोकरी, पगार, जात, धर्म. सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणावर होणारे व्हिडिओ तसेच छायाचित्रांची प्रचंड चर्चा होते. गेल्या काही दिवसांत अशीच एक इमेज व्हायरल (Image Viral on Social Media) झाली आहे. त्या इमेजवर वधू-वर पक्षांनी घालून दिलेल्या अटी (Conditions) मात्र हटके आहेत. अटींची मोठी यादीच इमेजवर जाहीर करण्यात आली आहे.

पार्टनरच्या शिक्षणाची अपेक्षा यापासून ते पार्टनरच्या घरामध्ये किती सदस्य आहेत? तसेच सदस्य कोण, कशा स्वभावाचे आहे? आदी अटी नोंदवण्यात आल्या आहेत. अटींची मोठी यादी पाहून या सर्व अपेक्षा पूर्ण तरी कशा करणार? असा स्वाभाविक प्रश्न देखील अनेकांना पडला आहे.

हे सुद्धा वाचा

अजबगजब अटींमुळे जोरदार चर्चा

हल्लीच्या जमान्यात प्रेमविवाहांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे पूर्वापार चालत आलेली बोलणी, वधू-वर पक्षांकडून घालण्यात आलेल्या अटी, अपेक्षा, मुलामुलीची पत्रिका पाहणे, अधिक गोष्टी दुर्मिळ बनत चालल्या आहेत.

सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेली अटींची मोठी यादी सर्वांनाच थक्क करत आहे. बऱ्याच जणांना ही यादी सोशल मीडियावर विशेषतः ट्विटरवर शेअर करण्याचा मोह आवरता आलेला नाही.

ट्विटरवर ज्या ज्या ठिकाणीही यादी शेअर केली गेली आहे, तेथे तेथे अनेक खुमासदार कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला आहे. काही लोक या अटींवर नाराजीचा सूर आळवत आहेत, तर तितक्याच प्रमाणात लोक यादी शेअर करीत लग्नाच्या बोलणीतील अटींची मजा लुटत आहेत.

काय आहेत अटी?

आपला पार्टनरचा जन्म 1992 पूर्वी झालेला नसावा.

पार्टनरने एमबीए, एमटेक, किंवा पीजीडीएमची डिग्री पूर्ण केलेले असणे आवश्यक असेल.

विशेष म्हणजे या डिग्रीदेखील विशिष्ट कॉलेजमधून घेतलेल्या असल्या पाहिजेत. कॉलेजच्या नावांचा देखील उल्लेख करण्यात आला आहे.

पार्टनरला दोनपेक्षा अधिक भाऊ बहीण नसावे.

वार्षिक पगार कमीत कमी 30 लाखांपेक्षा कमी नसला पाहिजे.