AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

18 तासांचा प्रवास करण्यासाठी निघालेले विमान थेट 35 वर्षानंतर जमिनीवर उचानक उतरले, दरवाजा उघडताच उडाली खळबळ

18 तासांचा प्रवास करुण्यासाठी निघालेले विमान अचानक झाले गायब. ज्यामध्ये होते 513 प्रवासी. तब्बल 35 वर्षानंतर अचानक जमिनीवर उतरले. दरवाजा उघडताच उडाली होती खळबळ.

18 तासांचा प्रवास करण्यासाठी निघालेले विमान थेट 35 वर्षानंतर जमिनीवर उचानक उतरले, दरवाजा उघडताच उडाली खळबळ
Image Credit source: Social media
soneshwar.patil
soneshwar.patil | Updated on: Jan 14, 2026 | 4:23 PM
Share

Santiago Flight 513 : जगभरात अशा अनेक रहस्यमय आणि अंगावर काटा आणणाऱ्या कथा बघायला मिळत आहेत. ज्यामध्ये काही कथा विज्ञानाच्या पलीकडच्या आहेत तर काही मानवी कल्पनाशक्तीला आव्हान देणाऱ्या आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका रहस्यमय कथेबद्दल सांगणार आहोत. ही कथा आहे Santiago Flight 513 विमानासंदर्भातील. ही कथा केवळ विमान अपघाताची नाही तर वेळेच्या गूढाशी जोडलेली असल्याचे मानले जाते.

मिळालेल्या माहितीनुसार, Santiago Flight 513 हे विमान 1954 साली दक्षिण अमेरिकेतील सॅंटियागो येथून उड्डाण घेऊन ब्राझीलमधील पोर्टो एलेग्रे येथे जाणार होते. साधारण 18 तासांचा प्रवास करून हे विमान आपल्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, अटलांटिक महासागराच्या वरून जात असताना हे विमान अचानक रडारवरून गायब झाले.

35 वर्षानंतर विमान जमिनीवर उतरले

विमानाचा कोणताही संपर्क न झाल्याने आणि कुठलाही अपघातस्थळाचा पुरावा न मिळाल्याने अधिकाऱ्यांनी हे विमान समुद्रात कोसळले असावे असा अंदाज लावला. हे विमान शोधण्यासाठी शोधमोहीम राबवण्यात आली पण काहीही हाती लागले नाही. त्यानंतर अखेर हे प्रकरण बंद करण्यात आले.

मात्र या कथेतील खरा धक्का तब्बल 35 वर्षांनंतर म्हणजेच 1989 मध्ये सर्वांना बसला असं सांगितले जाते. कथेनुसार, हेच विमान अचानक ब्राझीलमधील पोर्टो एलेग्रे विमानतळावर उतरले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे विमानाची रचना आणि क्रमांक हे 1954 मधीलच होते.

दरवाजा उघडताच उडाली होती खळबळ

विमान जेव्हा विमानतळावर उतरले तेव्हा ते पाहण्यासाठी जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा आतमधील दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. विमानातील सर्व प्रवासी आपापल्या सीटवर होते. मात्र, त्यांचे फक्त सापले तिथे होते. या विमानाचा पायलट देखील त्याच्या जागेवर होता. जिथे तो उड्डाणाच्या वेळी बसलेला. या विमानामध्ये ना आग लागली ना कोणताही अपघात झाल्याची गोष्ट दिसून आली नाही.

या घटनेनंतर जगभरात अनेक तर्क-वितर्क सुरू झाले. काहींनी याला टाइम ट्रॅव्हलशी जोडले तर काहींनी ही कथा पूर्णपणे अफवा असल्याचे म्हटले. आजपर्यंत या घटनेबाबत कोणताही अधिकृत सरकारी किंवा विमान वाहतूक संस्थेचा ठोस पुरावा उपलब्ध नाही.

Disclaimer : प्रिय वाचकांनो, ही बातमी फक्त माहिती व जागरूकतेसाठी सादर करण्यात आली आहे. या कथेमागील सत्यतेची कोणतीही अधिकृत पुष्टी उपलब्ध नाही. ही कथा विविध माध्यमे, लोककथा आणि इंटरनेटवरील माहितींवर आधारित आहे. वाचकांनी याकडे गूढकथा म्हणूनच पाहावे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन उत्साहात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन उत्साहात.
ठाकरे बंधू एकत्र येणं म्हणजे भीतीसंगम! फडणवीसांची टीका
ठाकरे बंधू एकत्र येणं म्हणजे भीतीसंगम! फडणवीसांची टीका.
काँग्रेस जिंकते तेव्हा.... PADUच्या वादावर भाजपचं प्रत्युत्तर
काँग्रेस जिंकते तेव्हा.... PADUच्या वादावर भाजपचं प्रत्युत्तर.
उद्या मतदान, अनेक भागात पैसे वाटल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
उद्या मतदान, अनेक भागात पैसे वाटल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?.
त्यांची डोर आमच्या हातात आहे! शिरसाट यांचा इम्तियाज जलील यांना टोला
त्यांची डोर आमच्या हातात आहे! शिरसाट यांचा इम्तियाज जलील यांना टोला.
संक्रातिनिमित्त विठ्ठल रूक्मिणी मंदिरात वाण वसासाठी महिलांची गर्दी
संक्रातिनिमित्त विठ्ठल रूक्मिणी मंदिरात वाण वसासाठी महिलांची गर्दी.
ठाकरे बंधु सहकुटुंब मुंबादेवीच्या दर्शनाला | VIDEO
ठाकरे बंधु सहकुटुंब मुंबादेवीच्या दर्शनाला | VIDEO.
पाडू मशीन कधी आणि का वापरणार? भूषण गगराणींनी सर्व सांगितलं
पाडू मशीन कधी आणि का वापरणार? भूषण गगराणींनी सर्व सांगितलं.
BMC Election 2026 : EVM ला जोडणारं पाडू मशीन म्हणजे काय? जाणून घ्या
BMC Election 2026 : EVM ला जोडणारं पाडू मशीन म्हणजे काय? जाणून घ्या.
मतदानाच्या दिवशी ईव्हीएमसोबत नवीन मशीन... राज ठाकरे प्रचंड संतापले
मतदानाच्या दिवशी ईव्हीएमसोबत नवीन मशीन... राज ठाकरे प्रचंड संतापले.