Video: शेकडो किलोचं पोतं एका झटक्यात फेकलं, लोक म्हणाले, बोला बजरंगाची कमाल, हमाल, दे धमाल!

| Updated on: Dec 04, 2021 | 3:42 PM

एक गोणी समोरील कामगार त्याच्या खांद्यावर देतो, ही गोणी खूप जड असेल हे व्हिडीओ पाहिल्यानंतर लगेच कळते, मात्र, हा कामगार ती गोणी सहज उचलतो, आणि पळत पळत येतो, आणि ट्रकच्या वरच्या फाळक्यावरुन ही गोळी थेट गोदामातील इतर गोण्यांवर फेकतो.

Video: शेकडो किलोचं पोतं एका झटक्यात फेकलं, लोक म्हणाले, बोला बजरंगाची कमाल, हमाल, दे धमाल!
धान्याचं पोतं सहज फेकणारा कामगार
Follow us on

सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही तुम्हाला हसवतात, तर काही तुम्हाला भावनिक करतात. काही व्हिडीओ तुम्हाला आश्चर्यचकीतही करतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल, की भावात लय दम आहे…इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून या व्हिडीओत तुम्ही एका मजुरात किती ताकद असते हे पाहू शकता. (The video of a laborer throwing a sack of hundreds of kilos goes viral)

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये, एक कामगार ट्रकमध्ये उभा दिसतो आहे. त्याने डोक्यावर एक कापड घेतलेलं आहे, त्याच्यासमोर धान्याच्या गोण्या आहेत, त्यातील एक गोणी समोरील कामगार त्याच्या खांद्यावर देतो, ही गोणी खूप जड असेल हे व्हिडीओ पाहिल्यानंतर लगेच कळते, मात्र, हा कामगार ती गोणी सहज उचलतो, आणि पळत पळत येतो, आणि ट्रकच्या वरच्या फाळक्यावरुन ही गोळी थेट गोदामातील इतर गोण्यांवर फेकतो. इतकी जड गोणी तो ज्या सहजगतीने दूरवर आणि बरोबर इतर गोण्यांच्या रांगेत फेकतो, हे पाहून कुणाच्या अंगावर शहारे उभे राहतील. प्रोफेशनल थाळीफेक, गोळेफेक वा भालाफेकीत जे कौशल्य वापरलं जातं, तेच कौशल्य या मजुराकडे असल्याचं दिसतं. फरक इतकाच आहे की हा, कुठला खेळ नाही तर जीवन जगण्यासाठीची तारेवरची कसरत आहे.

पाहा व्हिडीओ:

1.raman.gill या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ 3 आठवड्यापूर्वी शेअर करण्यात आहे, ज्याला आतापर्यंत 6 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. हा व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियाच्या इतरही प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. या व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरने लिहलं, बोला बजरंगाची कमाल, हमाल दे धमाल, तर एक युजर म्हणाला, असं टॅलेंट आपल्याकडे आयुष्यभर गोण्याच उचलत राहतं. यातील बहुतांश युजरने या मजुराच्या कौशल्याचं कौतुक तर केलं, पण व्यवस्थेविषयी आपला रागही व्यक्त केला. जर अशा तरुणांना संधी दिली, तर ते जगात आपलं नाव सुवर्णक्षरात लिहतील असंच अनेकांचं म्हणणं असल्याचं दिसतं आहे. तुम्हाला या व्हिडीओविषयी काय वाटतं, हे आम्हाला नक्की कळवा.

हेही पाहा:

Video: जेवण घशात अडकलं, श्वास गुदमरला, आणि त्याचा जीव जाणार तितक्यात…पाहा व्हिडीओ!

Video: बॉलसारखा गोल, 4 पाय आणि विचित्र चेहरा, या समुद्री प्राण्याला तुम्ही ओळखता का?