Viral Video : विंचवाची शेती कधी पाहीलीयं का ? व्हिडीओ पाहून धक्का बसेल

मत्स्यशेती तुम्ही पाहीली असेल परंतू विंचवाची शेती कधी तुम्ही पाहीली आहे का ? चला पाहूया कशी असते विंचवाची शेती आणि ती कशासाठी केली जाते ?

Viral Video : विंचवाची शेती कधी पाहीलीयं का ? व्हिडीओ पाहून धक्का बसेल
scorpion farm
Image Credit source: socialmedia
| Updated on: Sep 07, 2023 | 2:42 PM

नवी दिल्ली | 7 सप्टेंबर 2023 : विंचवाच्या विषाला उतारा मिळविणे कठीण असते. आपल्या संस्कृतीत तर लोकगीतात आणि भारुडातही विंचवाला अढळस्थान आहे. परंतू विंचु दंशाने देखील माणसाचा जीव जाऊ शकतो. विषारी सापाच्या दंशाने जसा माणसाला धोका असतो तसा विंचुच्या दंशाचा देखील असतो. विंचवाचे विष भिनले की लवकर उतरत नाही. वेदनेने माणूस अर्धमेला होतो. परंतू ओसाड जागी दगडा खाली लपून असलेले हे छोटे जीव खूपच खतरनाक असतात. परंतू या विंचवांची शेती केली जाते असे तुम्हाला कोणी सांगितले तर खरे वाटेल का ?

सोशल मिडीयावर विंचूच्या शेतीचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की विंचवाचे विष खूपच महाग दरात विकले जाते. त्यामुळे अनेक ठिकाणी विंचवांचे पालन देखील केले जाते. सोशल मिडीयावर विंचवाच्या शेतीचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्याला पाहून तुम्हाला हादरा बसेल. कदाचित इतके विंचू एकत्र पाहून तुमच्या अंगावर काटा देखील येऊ शकेल.

ट्वीटरवर ( एक्स ) व्हायरल झालेला व्हिडीओ –

व्हायरल व्हिडीओत विंचूची झुंड पाहून तुमचा थरकाप उडेल. इतक्या संख्येतील विंचूंना पाहून तुम्हाला भिती वाटू शकते. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की एका घरातील रुममध्ये विंचू पाळले जात आहे. या विंचूंना वेळोवेळी खायला दिले जात असते. त्यांचे विष अनेक औषधात वापरले जात असते. त्यामुळे सापाच्या विषाप्रमाणे विंचूच्या विषाला देखील मोठी मागणी असते. आता हे विंचू छोटे आहेत. त्यांना मोठे झाल्यावर लॅबोरेटरीत नेऊन त्यांचे विष काढले जाईलय एक लिटर विंचूच्या विषाची किंमत आठ कोटी रुपयांपर्यंत असू शकते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की एका विंचूच्या शरीरात केवळ दोन थेंब विष निघते.

विंचूचा हा व्हिडीओ अंगावर काटे आणणारा आहे. सोशल मिडीयावर तो चांगलाच व्हायरल होत आहे. सोशल मिडीया प्लॅटफॉर्म X वर ( आधी ट्वीटर ) @fasc1nate नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 97 लाख युजरनी पाहीला आहे. हा व्हिडीओ 69 हजाराहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. या विंचूंना पाहून अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रीया दिल्या आहे. अनेकांनी यास भयानक म्हटले आहे. अनेकांना प्रश्न पडलाय की जेवण देणाऱ्यांना हे विंचू चावत कसे नाहीत ?