
सोनं म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतो तो तेजस्वी, पिवळसर झळाळणारा धातू, लग्नसराई, गुंतवणूक आणि परंपरेचा अविभाज्य भाग. पण सोनं म्हणजे केवळ सौंदर्य आणि प्रतिष्ठेचा विषय नाही, तर त्यामागे लपलेले आहेत अनेक आश्चर्यकारक वैज्ञानिक, ऐतिहासिक आणि गणिती पैलू. आपण ज्याला केवळ दागिन्यांचं माध्यम समजतो, त्याच सोन्याच्या बाबतीत अशी तथ्यं आहेत जी तुमच्या कल्पनाही बाहेरची आहेत
एका खोलीत मावणारं जगातलं सगळं सोनं? होय! आतापर्यंत पृथ्वीवरून सुमारे 1,87,000 टन सोनं बाहेर काढण्यात आलं आहे. हे सगळं जर वितळवून एका चौकोनी घनरूपात साठवलं, तर तो घनफळ फक्त 21 मीटर लांब, रुंद आणि उंच असलेला ठोकळा असेल
२०१२ मध्ये ऑस्ट्रेलियात बनलेलं जगातलं सर्वात मोठं सोन्याचं नाणं १००० किलो वजनाचं आहे. आश्चर्य म्हणजे त्याचा व्यास फक्त ८० सेंटीमीटर आहे! सोन्याचं घनता आणि वजन किती जबरदस्त आहे, याचं हे उत्कृष्ट उदाहरण.
२८ ग्रॅम सोन्यापासून ८० किमी ‘तार’?
होय, सोनं इतकं लवचिक आणि नाजूक असतं की केवळ 28 ग्रॅम सोन्यापासून ८० किलोमीटर लांब तार बनवता येते! आणि जर जगातलं सर्व सोनं अशा पातळ तारेत रूपांतर केलं, तर ती तार पृथ्वीला कोट्यवधी वेळा गुंडाळू शकेल
दागिन्यांमध्ये सोनंच का वापरलं जातं?
सोन्याची उष्णता वहन करण्याची क्षमता इतकी चांगली असते की दागिने घातले की ते त्वचेच्या तापमानाशी पटकन जुळवून घेतात – त्यामुळे ते थंड किंवा गरम जाणवत नाहीत. म्हणूनच सोन्याचे दागिने घालायला नेहमीच आरामदायक वाटतात.
रोमन काळात
रोमन सम्राट ज्युलियस सीझर आपल्या पराक्रमी सैनिकांना सन्मान म्हणून सोन्याची नाणी देत असे. त्या काळातही सोनं केवळ संपत्तीच नव्हे, तर बहादुरीचं प्रतीक मानलं जायचं.
अजून किती सोनं लपलंय पृथ्वीच्या गर्भात?
शास्त्रज्ञ मानतात की आजपर्यंत मिळालेल्या सोन्याच्या तुलनेत, त्याच्या कितीतरी पट अधिक सोनं अजूनही पृथ्वीच्या खोल पोटात गुप्त आहे! शोध सुरूच आहे!