AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा फोटो लव्ह लाईफ बद्दल सांगतो, काय दिसतंय आधी? फोटोकडे नीट बघा…

हा फोटो पहा आणि तुम्हाला सगळ्यात आधी काय दिसतंय ते सांगा. या फोटोमध्ये तुम्हाला चार गोष्टी दिसण्याची शक्यता आहे. पण खरं तर सर्वात आधी काय दिसतं यावर सगळं गणित आहे. तुम्ही प्रेमात कसे असता ते यावरून कळून येतं.

हा फोटो लव्ह लाईफ बद्दल सांगतो, काय दिसतंय आधी? फोटोकडे नीट बघा...
Optical illusion Image Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Sep 21, 2022 | 3:59 PM
Share

ऑप्टिकल भ्रम (Optical Illusion) हा सगळ्यात अनोखा प्रकार आहे. तो कधी तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल (Personality) सांगतो तर कधी तुमच्या स्वभावाबद्दल. कधी तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगतो तर कधी तुमच्या विचारांबद्दल! हे कोड्यासारखं (Puzzle) दिसणारं चित्र लोकांना गोंधळून टाकतं. ज्याची जशी नजर त्याला ते चित्र तसं दिसणार. ज्याचे जसे विचार त्याला ते आधी दिसणार असं इतकं साधं हे आहे. हे चित्र बघितल्यावर तुम्हाला आधी काय दिसतं यावर तुम्ही तुमच्या लव्ह लाईफमध्ये कसे आहात हे कळून येतं. सांगा तर मग काय दिसतंय तुम्हाला सगळ्यात आधी….

हा फोटो पहा आणि तुम्हाला सगळ्यात आधी काय दिसतंय ते सांगा. या फोटोमध्ये तुम्हाला चार गोष्टी दिसण्याची शक्यता आहे. पण खरं तर सर्वात आधी काय दिसतं यावर सगळं गणित आहे. तुम्ही प्रेमात कसे असता ते यावरून कळून येतं.

चित्राकडे नीट पाहिलं तर या ट्रेंडिंग चित्रात एक स्त्री, घोडेस्वार, घोडा किंवा सैनिक मागे उभे असलेलं दिसून येतंय. यापैकी तुम्ही कोणतं आधी पाहिलं ते सांगा.

जर तुम्ही पहिल्यांदा स्त्रीला पाहिलंत तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला प्रेमात झोप उडण्याची भीती वाटते. म्हणजे तुम्ही प्रेमात पडताना प्रचंड विचार करता. प्रॅक्टिकल आहात. याचा अर्थ असाही आहे की, तुम्ही स्वप्नांचे जग आणि वास्तव यांच्यात योग्य संतुलन राखले आहे.

जर तुम्हाला आधी सैनिक दिसत असतील तर तुम्हाला प्रेमात तुमचं दिसणं टिकवून ठेवण्याची भीती वाटते. आपण जर वाईट दिसायला लागलो तर आपल्या वाईट दिसण्यामुळे आपले संबंध बिघडू शकतात असं तुम्हाला सतत वाटतं.

जर तुम्ही पहिल्यांदा घोडा पाहिलात तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला प्रेमात नकाराची भीती वाटते.

त्याचबरोबर फोटोमध्ये बॅकग्राऊंडमध्ये उभे असलेले सैनिक पाहिले तर तुम्हाला प्रेमात आपल्यासोबत गेम होऊ शकतो अशी भीती वाटते. ज्याचा अर्थ तुम्ही तुमच्या नात्याबद्दल खूप संवेदनशील आहात असा आहे. हा ऑप्टिकल इल्यूजन अनेकांना खूप मजेशीर वाटतो

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना