AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या शहरात स्थायिक होण्यासाठी तुम्हाला तब्बल 25 लाख मिळणार! घर घेण्यासाठी सरकारच देणार पैसे

जिथे राहण्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत उलट त्यासाठी सरकारच तुम्हाला 25 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम द्यायला तयार आहे.

या शहरात स्थायिक होण्यासाठी तुम्हाला तब्बल 25 लाख मिळणार! घर घेण्यासाठी सरकारच देणार पैसे
Town from italyImage Credit source: Social Media
| Updated on: Nov 22, 2022 | 11:28 AM
Share

जर आम्ही तुम्हाला सांगितले की असे एक शहर आहे जिथे स्थायिक होण्याच्या बदल्यात लोकांना लाखो रुपये दिले जात आहेत तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल? साहजिकच तुम्हाला गंमत वाटेल. पण हे खरं आहे. भारताबाहेर एक देश आहे जिथे राहण्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत उलट त्यासाठी सरकारच तुम्हाला 25 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम द्यायला तयार आहे. होय, आग्नेय इटलीतील प्रेसिस Presicce शहरातील अधिका-यांनी जाहीर केले आहे की ते लोकांना शहरातील रिकामी घरं खरेदी करण्यासाठी आणि तिथे स्थायिक होण्यासाठी 30 हजार युरो देतील.

स्थानिक नगरसेवक आल्फ्रेडो पालीस यांच्या मते, निर्जन असलेल्या प्रेसिच शहराची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी ही योजना आखण्यात आलीये. याअंतर्गत 1991 पूर्वी बांधलेल्या अनेक रिकाम्या घरांमधील लोकांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे.

ही घरे त्यांच्या मालकांनी सोडून दिल्याची माहिती आहे. ही घरे नैसर्गिक देखाव्यांनी भरलेली आहेत, असे नगरसेवक सांगतात. याशिवाय हे शहर ऐतिहासिकदृष्ट्याही आश्चर्यकारक वास्तुकलेचे केंद्र राहिले आहे.

या आश्चर्यकारक ऑफरसाठी अर्ज प्रक्रिया लवकरच प्रेसिचच्या वेबसाइटवर सुरू केली जाऊ शकते. अधिक माहितीसाठी तुम्ही या वेबसाईटला भेट देऊन चेक देऊ शकता.

या भागातील घरांची किंमत सुमारे 25 हजार युरो आहे. या पैशात तुम्हाला इथे 50 चौरस मीटरचं घर खरेदी करता येणार आहे. विशेष म्हणजे तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार तुम्हाला पैसेही देत आहे, तेही 25 लाख रुपयांपेक्षा जास्त.

या शहराच्या जवळच सालेंटो शहर आहे, जिथे आपल्याला स्वच्छ पाणी, सांता मारिया दी ल्यूकाचा अद्भुत समुद्रकिनारा आहे.

या आधीही इटली अशीच काहीशी ऑफर देऊन प्रकाशझोतात आली. तेव्हा कलैब्रियामध्ये लोकांना स्थायिक करण्यासाठी सरकारने २४.७६ लाख रुपयांची ऑफर दिली होती. मग लोकांना अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने इथे नवीन व्यवसाय सुरू करण्यास सांगण्यात आले.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.