22 वर्षांपासून तिने मेकअपचा नाही उतरवला, आता चेहरा पाहूनच दचकते..
जर दुसऱ्या दिवशी सकाळी परत मेकअप करायचा आहेच, तर मग रात्री तो धुवून काढायची गरजच काय ? असा तिचा विचार होता. त्यामुळे तिने कित्येक वर्ष मेकअप धुतलाच नाही, पण त्याचा परिणाम एवढा भयानक झाला की...

मेकअप करायला कोणाला नाही आवडत?, छान दिसण्यासाठी, चेहऱ्याला उठाव देण्यासाठी , सौंदर्य वाढवण्यासाठी मेकअर करायला बहुतांश लोकांना आवडतंच. पण मेकअप केल्यानंतर, दिवसाअखेर किंवा झोपायला जाण्यापूर्वी मेकअप काढून चेहरा स्वच्छ धणं गरजेचं असतं. अनेक सौंदर्यतज्ज्ञही हाच सल्ला देतात. मात्र मेकअप काढून, चेहरा नीट धुतला नाही तर काय होऊ शकते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? चीनमधील गाओ या महिलेने कधीही विचार केला नव्हता की तिच्यासोबत असे काहीतरी वाईट घडेल.
ती वीस वर्षे दररोज मेकअप करत होती, पण तो काढणं किंवा उतरवणं, चेहरा धुणं तिला “झंझट, कटकट” वाटायाची. जर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा मेकअप लावावा लागणारचत असेल, तर रात्री तो का धुवावा? असा विचार ती करायची. पण त्याचा परिणाम खूप भयानक झाला. आता तिच्या चेहऱ्याची अवस्था बेक्कार झाली आहे, एवढी ॲलर्जी झाली की तिला ओळखणंच शक्य नाही. चेहरा एवढा सुजला, की साधं घाराबेहर पडण्याची देखील तिला भीती वाटू लागली.
22 वर्ष मेकअप उतरवलाच नाही
चीनमधील एक महिला आहे, तिचे नाव गाओ आहे. तिने स्वानुभवातून आता सोशल मीडियावर सर्वांना इशारा दिलाय, की मेकअप केल्यानंतर तो नीट काढणं, मेकअप उतरवणं देखील, चेहरा व्यवस्थित धुणंही खूप महत्वाचे आहे. तिने स्वतः 20 वर्षे मेकअप केला, पण कधीही तिचा चेहरा व्यवस्थित स्वच्छ केला नाही. ती चेहरा फक्त पाण्याने धुवायची आणि सकाळी चेहऱ्यावर पुन्हा मेकअप थापायची. सुरुवातीला सगळं व्यवस्थित चाललं होतं, पण या वर्षी त्याच्या चेहऱ्यावर इतकी ॲलर्जी झाली की, तिचा चेहरा पूर्णपणे सुजला होता. इतकं की तिला ओळखणेही कठीण झालं होतं. “असं वाटलं की हजारो मुंग्या माझ्या चेहऱ्यावर धावत आहेत.” अशी प्रतिक्रिया तिने दिली.
हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल ना, पण हे खरं आहे.
चेहऱ्याची वाईट अवस्था
गाओने सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमध्य़े सांगितलं की, आता तिची अवस्था अशी झाली आहे की तिला असे वाटते की तिच्या चेहऱ्यावर हजारो मुंग्या आहेत. तिला प्रचंड खाज सुटते, तिचा चेहरा सुरकुत्याने भरलेला आहे आणि भीतीमुळे तिने लोकांना भेटणेही बंद केले आहे. सुरुवातीला, तिने डॉक्टरांकडे जाण्याऐवजी स्किन क्लिनिकमध्ये जाऊन इंजेक्शन घेतलं, पण त्यामुळे तिची प्रकृती आणखी बिकट झाली. या अनुभवावरून धडा घेऊन गाओ आता सर्वांना समजावून सांगत्ये की, कोणताही मेकअप का, पण झोपण्यापूर्वी चेहरा व्यवस्थित स्वच्छ करणे आवश्यक आहे. फक्त पाण्यानेच नाही तर चांगल्या फेसवॉशने. अन्यथा चेहरा केवळ सुंदरच नाही तर भयानकही बनू शकतो असा इशारा तिने दिला.
सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल होताच, लाखो लोकांनी ती पाहिली. अशा परिस्थितीत, महिलेची ही अवस्था पाहून सोशल मीडिया यूजर्सनी भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, आणखी मेकअप कर ना, मला आशा आहे की तू आता शुद्धीवर आली असशील. दुसऱ्या युजरने लिहिले, बहिणी, तुझा चेहरा पाहून मला भीती वाटते, अशा अनेक कमेंट्स आल्या आहेत.
