काय सांगता, 24 वर्षाची महिला बनली 21 मुलांची आई!, दिवसाचा खर्च ऐकून चक्रावून जाल

क्रिस्टीना ओझटर्कने वयाच्या १७ व्या वर्षी आपल्या पहिल्या बाळाला नैसर्गिकरित्या जन्म दिल्यानंतर अवघ्या 10 महिन्यांत 10 सरोगेट बाळांना जन्म दिला. दहाव्या सरोगेटपासून ती आणि तिचा पतीने आणखी 21 बाळांना जन्म दिला.

काय सांगता, 24 वर्षाची महिला बनली 21 मुलांची आई!, दिवसाचा खर्च ऐकून चक्रावून जाल
child
| Edited By: | Updated on: Oct 26, 2021 | 10:02 AM

मुंबई : क्रिस्टीना ओझटर्कने वयाच्या १७ व्या वर्षी आपल्या पहिल्या बाळाला नैसर्गिकरित्या जन्म दिल्यानंतर अवघ्या 10 महिन्यांत 10 सरोगेट बाळांना जन्म दिला. दहाव्या सरोगेटपासून ती आणि तिचा पतीने आणखी 21 बाळांना जन्म दिला. रशियात राहणारी ही महिला 21 मुलांची आई आहे. या महिलेने तिच्या 21 मुलांचा सांभाळ करण्यासाठी 16 आया ठेवल्या आहेत.

क्रिस्टीना ओझटर्क, 24, जॉर्जिया, गॅलिपमधील एका करोडपतीची पत्नी आहे, हिने गेल्या वर्षी मार्च ते या वर्षी जुलै दरम्यान सरोगेट्सद्वारे पालक होण्यासाठी 1,46,78,156 रुपये खर्च केले. मूळची रशियाची असलेली क्रिस्टीना घरात राहणाऱ्या 16 आयांवर दरवर्षी $96,000 म्हणजेच 72,08,265 रुपये खर्च करते. वेळेनुसार वेगाने वाढणाऱ्या मुलांची काळजी घेण्यासाठी आया 24 तास काम करतात.

या कुटुंबात क्रिस्टीना तिच्या पतीच्या पहिल्या पत्नीच्या दोन मुलांसह एकूण 23 मुले एकाच छताखाली राहतात. क्रिस्टीना आग्रहाने सांगते की ती एक व्यावहारिक आई आहे. ती म्हणाली, “मी प्रत्येक वेळी मुलांसोबत असते, प्रत्येक आई जे काही करते ते करते.

लहानपणापासूनचे स्वप्न

“मी लहानपणापासून हे स्वप्न पाहत आहे. माझ्या पतीनेही एक मोठे, आनंदी कुटुंब असावे असे स्वप्न पाहिले होते. म्हणून आम्ही भेटल्यानंतर आम्ही आमचे स्वप्न प्रत्यक्षात आणू लागलो,” क्रिस्टीनाने फॅब्युलसला सांगितले.

दरमहा किती खर्च करतात?

क्रिस्टीनाने सोशल मीडियामधील एका पोस्टवर दरमहा किती खर्च करतात या बद्द्ल माहीती दिली. तिच्या मोठ्या कुटुंबासाठी सरोगेट्सना सुमारे £1,38,000 दिले आहेत. यापूर्वी, 24 वर्षीय तरुणीने द सनला सांगितले होते की ती मुलांच्या आवश्यक गोष्टींसाठी दर आठवड्याला सुमारे £3,500 ते £4,200 खर्च करते. तर मुलांना सांभाळणाऱ्या आयांसाठी, त्यांना आठवड्याला £350 दिले जातात.16 आयांवर दरवर्षी $96,000 म्हणजेच 72,08,265 रुपये खर्च करते.

इतर बातम्या :

Video | कारमध्ये मांजर अडकली, शर्थीच्या प्रयत्नानंतर शेवटी जीव वाचवला, औरंगाबादकरांवर कौतुकाचा वर्षाव

Video: ट्रेन विकत घ्यायचीय, 300 कोटींचं कर्ज हवंय, सतत फोन करुन त्रास देणाऱ्या बँक कर्मचाऱ्याची ग्राहकाकडून फिरकी!

Video: आकाश भेदणाऱ्या गरुडाला कधी पोहताना पाहिलंय? गरुडाची आणखी एक कला दाखवणारा व्हिडीओ