
गेल्या काही महिन्यांपासून मेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चर्चेचा विषय आहेत. कारण त्यांनी जगातील बहुतांशी देशांवर कर लादला आहे. मात्र आता ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर खूप ट्रेंड होत आहेत. बऱ्याच लोकांनी X वर ‘ट्रम्प इज डेड’ असं लिहिलं आहे. 1 लाख 44 हजारांहून अधिक लोकांनी अशी पोस्ट केली आहे. त्यामुळे आता 79 वर्षीय डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रकृतीबाबत बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
जुलैमध्ये, डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाताला दुखापत झाल्याची आणि घोट्यात सूज आल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे आता ट्रम्प यांची प्रकृती बिघडली तर नाही ना अशा चर्चा रंगली आहे. मात्र अनेरिकेने या अफवेचे खंडन केले आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी 27 ऑगस्ट रोजी यूएसए टुडेला एक मुलाखत दिली होती. यावेळी त्यांनी काही भयानक घडले मी जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे असं म्हटलं होतं. त्यामुळे तेव्हापासून ट्रम्प यांच्या आरोग्याबाबत विविध चर्चा रंगल्या आहेत.
डोनाल्ड ट्रम्प हे सध्या पूर्णपणे निरोगी आणि स्वस्थ आहेत. त्यांची तब्येत खूप चांगली आहे असं व्हान्स यांनी म्हटलं होतं. मात्र जेडी व्हान्स यांनी काही आपात्कालिन परिस्थिती उद्भवली आणि माझी गरज भासली तर ती नेतृत्व करण्यास तयार आहे. कारण मला गेल्या 200 दिवसांमध्ये चांगले प्रशिक्षण मिळाले आहे. देव न करो, पण एखादा भयानक घटना घडली तर मला मिळालेले प्रशिक्षण फायदेशीर ठरु शकते.
जेडी व्हान्स यांनी असंही स्पष्ट केलं होतं की, ट्रम्प यांची प्रकृती चांगली आहे, ते रात्री उशिरापर्यंत आणि सकाळी लवकर पूर्ण उर्जेने काम करत आहेत.’ दरम्यान, ट्रम्प हे 79 वर्षांचे आहेत. तसेच ते अमेरिकेचे सर्वात वयस्कर राष्ट्राध्यक्ष आहेत, तर 41 वर्षीय जेडी व्हान्स हे अमेरिकन इतिहासातील तिसरे सर्वात तरुण उपराष्ट्राध्यक्ष आहेत. याआधी जुलै महिन्यातही ट्रम्प यांच्या आरोग्याबाबत अनेक अफवा समोर आल्या होत्या. मात्र सध्याची अफवा ही सर्वात जास्त चर्चेत आली आहे.