Village Of Twins : या गावात फक्त जुळी मुलं जन्माला येतात, नेमकं रहस्य तरी काय?
Village Of Twins : भारतातील संस्कृति आणि ऐतिहासिक रहस्य, महत्व यामुळे परदेशातले अनेक लोक आपल्या देशाकडे आकर्षित करतात. देशात आजही अशी अनेक गावं आहेत, जी त्यांच्या वेगळेपणामुळे ओळखली जातात. असंच एक गाव म्हणजे.. जुळ्यांचं गाव !

भारतात लाखो गावं आहेत, त्यातील प्रत्येकाचं क असं विशेष खासपण, वैशिष्ट्य आहे. प्रत्येक गावाची काही कथी, गोष्ट आहे. काही गावं तर त्यांच्या वेगळेपणामुळे ओळखली जातात, प्रसिद्ध आहेत. त्यापैकीच एक गाव , त्याची वेगळी ओळख म्हणजे ते जुळ्यांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. ऐकून आश्चर्य वाटलं ना ? पण ते करं आहे. भारतातलं एक गाव जुळ्यांचं गाव म्हणून ओळखलं जात असून तिथे 10-20 नव्हे तर 450 पेक्षा जास्त जुळ्या व्यक्ती राहतात. या गावात बहुतांश वेळा ज़ुळ्या मुलांचाच जन्म होतं. म्हणूनच त्याला जुळ्यांचं गाव म्हटलं जातं. पण असं (जुळ्यांचा जन्म) का होतो, हे गूढ काही अद्याप उलगडू शकलेलं नाही.
जुळ्यांचं गाव !
हे गाव आहे, केरळमध्ये… केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील कोडिन्ही गावची ओळखच मुळी जुळ्यांचं गाव अशीच आहे. अवघी 2000 लोकांची वस्ती असलेलं हे छोटं गाव, पण त्यात बहुतांश लोकं ही जुळीच आहेत. कोडिन्ही गावात येथे जुळ्या मुलांचा जन्मदर असामान्यपणे जास्त आहे. या गावातील जवळजवळ प्रत्येक घरात जुळ्या मुलांची किमान एक तरी जोडी आहे. पण हे पाहून अनेक जण अवाक् होतात. भारतात सरासरी जन्मदर दर 1000 जन्मांमागे 8 ते 9 ९ जुळे आहेत, तर कोडिन्हीमध्ये हा दर सरासरी 42 ते 45 पर्यंत वाढतो.
वैज्ञानिकही हैराण
या गावाबद्दल ऐकून आत्तापर्यंत अनेक शास्त्रज्ञांनी या गावाचा अभ्यास केला आहे. पण या गावात प्रत्येक घरात एकदा तरी जुळ्यांचा जन्म का होतो, याचा शोध लावणं, त्यामागचं कारण शोधणं त्यांना शक्य झालेलं नाही. पण काही सिद्धांत असे सूचित करतात की अन्न, पाणी किंवा अनुवंशशास्त्र यासारखे घटक हे जुळ्या मुलांच्या जन्माच्या उच्च दरात योगदान देऊ शकतात.
अधिकृत आकडे
2008 साली या गावात अंदाजे 280 जुळी मुले होती. यातील बरीच मुले 15 वर्षांपेक्षा कमी वयाची होती. त्यावेळी 80 जुळी मुले गावातील शाळेत शिकत होती. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 60 ते 70 वर्षांमध्ये जुळ्या मुलांची संख्या सातत्याने वाढत आहे.
जगभरातील लोकं होतात आकर्षित
कोडिनही गावातील रहिवाशांसाठी मात्र हे ( जुळी मुलं) अभिमानाचे आणि ओळखीचे प्रतीक आहे. विशेष म्हणजे केरळमधल्या या गावावर आत्तापर्यंत जगभरात अनेक डॉक्यमेंट्रीज, वैज्ञानिक लेख आणि मीडिया रिपोर्ट्स छापले गेले आहेत, प्रसिद्ध झाले आहेत. येथील जुळ्या मुलांमुळे या गावाकडे शास्त्रज्ञ आकर्षित होतात आणि हे नेमकं घडतं कसं, त्यामागे काय रहस्य आहे, हे जाणून घेण्याची लोकांमध्ये अद्यापही उत्सुकता आहे.
