ट्वीटर सेवा झाली ठप्प, फेसबुक-इन्स्टाग्रामवरही येत आहेत अडचणी, हजारो नेटकरी हैराण
इंटरनेट महाजालातील नेट युजरची पहाट सोशल साईटच्या बिघाडानेच सुरू झाल्याची माहीती पुढे आली आहे. जगभरातील लाखो लोक सोशल साईटचा वापर करू शकले नाहीत. काय झाली गडबड

दिल्ली : सोशल मिडीयाच्या मंडळींना गुरूवारी पहाटे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. कारण ट्विटर, फेसबुक ( Facebook ) आणि इंस्टाग्राम ( Instagram ) वापर करताना अडचणी येत आहेत. जगभरातील सोशल मिडीया वापरणाऱ्या युजरना या बिघाडाचा फटका बसला, जगभरातील लोक सोशल मिडीयावर त्यांचे नित्याचे व्यवहार करू शकले नाहीत. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी या कंपन्या कामाला लागल्या आहेत. तुमच्यापैकी काही जणांच्या अपेक्षेप्रमाणे Twitter कदाचित काम करत नसेल असे टीमने नमूद केले आहे. त्रासाबद्दल दिलगीर आहोत क्षमस्व. आम्हाला तुम्हाला त्रास दिल्याची जाणीव आहे आणि हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी आम्ही काम करीत आहोत असे ट्वीटरने म्हटले आहे.
इंटरनेट महाजालातील नेट युजरची पहाट सोशल साईटच्या बिघाडानेच सुरू झाल्याची माहीती पुढे आली आहे. जगभरातील लाखो लोक सोशल साईटचा वापर करू शकले नाहीत. यूएसमधील इंटरनेट वापरकर्त्यांनी सर्वाधिक आऊटेज नोंदवले आहेत. अनेक ट्विटर वापरकर्त्यांनी सांगितले की ते नवीन ट्विट पोस्ट करू शकत नाहीत. पोस्ट केल्यावर त्यांना ‘तुम्ही ट्विट केल्यावर त्यांना तुम्ही ट्वीट करण्याची दैनिक मर्यादा ओलांडली आहे’ असा एरर मेसेज येत होता.
ट्वीटर वापरणाऱ्यांना पहाटे तीनच्या सुमारास इंटरनेट युजरना त्रासाला सामोरे जावे लागले. सकाळी 4.23 वाजता, ट्विटरवर सर्वाधिक 810 लोकांनी रिपोर्ट करीत समस्या नोंदवली. अॅपवरील वापरकर्त्यांनी 43% , वेबसाइटवरील युजर्सनी 25% आणि सर्व्हर कनेक्शनशी संबंधित 12% रिपोर्ट फाईल झाले आहेत.
मेटा प्लॅटफॉर्म्स – ट्विटर आणि फेसबुक वापरकर्त्यांनी सर्वाधिक तक्रारी केल्या आहेत. त्यांच्या रिपोर्टमध्ये वाढ झाली आहे. 12,000 पेक्षा जास्त फेसबुक वापरकर्त्यांनी तक्रार केली आणि सुमारे 7,000 लोकांनी Instagram साठी आऊटेज नोंदवले. काही वापरकर्त्यांनी फेसबुकची ऑनलाइन मेसेजिंग सेवा वापरली आहे
टेस्लाचे मालक इलॉन मस्क यांनी ऑक्टोबरमध्ये ट्वीटर कंपनी ताब्यात घेतल्यापासून, ट्विटरने आपले कर्मचारी कपात केली आहे. त्यामुळे कंपनीकडे अभियंते कमी आहेत. यामुळे ट्विटरच्या सेवेवर परिणाम झाला असून त्यात विविध तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला आहे.
