AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baby ‘Pakora’ कुणाचं काय तर कुणाचं काय? मुलीचे नाव ठेवले ‘पकोडा’

एक जोपडं नेहमी या रेस्टॉरंट मध्ये जेवणाचा आस्वाद घ्याला यायचे. या रेस्टॉरंटमध्ये मिळणारी पकोडा ही भारतीय डिश या जोडप्याचा फेव्हरेट पदार्थ आहे. यामुळे या जोडप्याने आपल्या मुलीचेच नाव पकोडा असे ठेवले आहे.

Baby 'Pakora' कुणाचं काय तर कुणाचं काय? मुलीचे नाव ठेवले 'पकोडा'
| Updated on: Sep 04, 2022 | 7:15 PM
Share

दिल्ली : आई-वडिल होणं ही प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातील खूप मोठी गोष्ट असते. बाळ जन्माला येणाआधीच आई-वडिल मुलाच्या नावाचा विचार करत असतात. नाव ठेवताना नावाला महत्व असले पाहिजे किंवा ते अर्थपूर्ण असले पाहिजे यावर पालकांचा भर असतो. यामुळे मोठ्या आवडीने आणि खूप विचार करुन मुलांचे नाव ठेवतात. मात्र, ब्रिटनमधील एका जोडप्याने आपल्या बाळाचे नाव एका भारतीय डिशवरुन ठेवले आहे. या जोडप्याने आपल्या मुलीचे नाव पकोडा असे ठेवले आहे.

या जोडप्याला पकोडे इतके आवडतात की त्यांनी डायरेक्ट आपल्या मुलीचेच नाव पकोडा ठेवले आहे. द कॅप्टन्स टेबल हे आयर्लंडमधील न्यूटाउन अब्बे येथील प्रसिद्ध रेस्टॉरंटने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्ट मध्ये जगात पहिल्यांदाच ठेवण्यात आलेल्या या अनोख्या नामकरणाची माहिती देण्यात आली आहे.

हे रेस्टॉरंट आपल्या सोशल मीडिया पेजवर रेसिपीसह अनोख्या आणि इंटरेस्टींग बातम्या देखील शेअर करते. एक जोपडं नेहमी या रेस्टॉरंट मध्ये जेवणाचा आस्वाद घ्याला यायचे. या रेस्टॉरंटमध्ये मिळणारी पकोडा ही भारतीय डिश या जोडप्याचा फेव्हरेट पदार्थ आहे. यामुळे या जोडप्याने आपल्या मुलीचेच नाव पकोडा असे ठेवले आहे.

रेस्टॉरंटने नवजात मुलीचा फोटो शेअर करत जोडपल्याने ठेवलेले पकोडा हे नाव सोशल मिडीयावर शेअर केले आहे. रेस्टॉरंटने बिलाच्या पावतीचा फोटोही शेअर केला होता ज्यात काही पदार्थांची नावे होती ज्यात ‘पकोडे’ याचाही समावेश आहे. या पोस्टवर सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी जोडप्याचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या ट्विवटर वर बेबी पकोरा या टैगने ही बातमी खूप मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहे.

Follow Us
'विभागत महिला नको म्हणून डावललं' मनिषा म्हैसरांचा महायुतीतील मंत्र्याव
'विभागत महिला नको म्हणून डावललं' मनिषा म्हैसरांचा महायुतीतील मंत्र्याव.
इराण- अमेरिकेचं आणखी बिनसलं? इस्लामाबादमधील भेटीत नेमकं काय -काय घडलं?
इराण- अमेरिकेचं आणखी बिनसलं? इस्लामाबादमधील भेटीत नेमकं काय -काय घडलं?.
भारताकडून इराणला मदतीचा हात, वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप रवाना
भारताकडून इराणला मदतीचा हात, वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप रवाना.
वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिला - हर्षवर्धन सपकाळ
वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिला - हर्षवर्धन सपकाळ.
ब्लॅक मॅजिक करणारे ते नेते कोण? रोहित पवाराचा रोख नेमका कुणाकडे?
ब्लॅक मॅजिक करणारे ते नेते कोण? रोहित पवाराचा रोख नेमका कुणाकडे?.
'सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार' मुख्यमंत्री म्हण
'सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार' मुख्यमंत्री म्हण.
हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर.
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; शिजूका नॉडी नावाने असंख्य कॉल्स
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; शिजूका नॉडी नावाने असंख्य कॉल्स.
'वारकरी संप्रदायात 60 % लोकांच्या...' शरद पवारांच्या भाष्यावरुन राजकीय
'वारकरी संप्रदायात 60 % लोकांच्या...' शरद पवारांच्या भाष्यावरुन राजकीय.
सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका? बीडमधील पत्रामुळे खळबळ
सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका? बीडमधील पत्रामुळे खळबळ.