AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सॅमसंग गॅलेक्सी A57 5G आणि A37 5G भारतात विक्रीसाठी उपलब्ध, जाणून घ्या त्यांची किंमत

सॅमसंग लेक्सी A57 5G आणि A37 5G आता भारतात खरेदीसाठी उपलब्ध झाले आहेत. कंपनी यावर एक्सचेंज बोनस आणि कॅशबॅक ऑफर्स देखील देत आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या फोनच्या किमतीबद्दल जाणून घेऊयात.

सॅमसंग गॅलेक्सी A57 5G आणि A37 5G भारतात विक्रीसाठी उपलब्ध, जाणून घ्या त्यांची किंमत
SAMSUNG GALAXY A57 5G Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 11, 2026 | 9:39 PM
Share

सॅमसंग कंपनीने त्यांचे नवीन गॅलेक्सी A सीरीजमधील दोन स्मार्टफोन, गॅलेक्सी A57 5G आणि गॅलेक्सी A37 5G, भारतात विक्रीसाठी लाँच केले आहेत. दोन्ही फोन मिड-रेंज सेगमेंटमध्ये प्रीमियम फीचर्स देतात. तर या फोनमध्ये 6.7-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. कंपनीकडून या स्मार्टफोनमध्ये दीर्घकालीन सॉफ्टवेअर अपडेट्सचे आश्वासही ​दिले ​आहे. लाँचसोबत आकर्षक ऑफर्सही दिल्या जात आहेत. चला तर मग या दोन्ही स्मार्टफोनच्या किमतीबद्दल जाणून घेऊयात.

सॅमसंग गॅलेक्सी A57 5G आणि A37 5G भारतातील किंमती

गॅलेक्सी A57 5G च्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत भारतात 56 हजार 999 रूपयांपासून सुरू होते. तर 12GB रॅम व्हेरिएंट 62 हजार 499 मध्ये उपलब्ध आहे. हा फोन ऑसम नेव्ही, ऑसम आयसीब्लू आणि ऑसम लिलॅक या रंगांमध्ये येतो.

व्हेरिएंट असलेल्या फोनची किंमत

तर दुसरीकडे गॅलेक्सी A37 5G च्या 8GB आणि 128GB व्हेरिएंटची किंमत 41 हजार 999 रूपयांपासून सुरू होते. तर 12GB रॅम आणि 256GB चे मॉडेल्स देखील उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत अनुक्रमे 47 हजा 499 रूपये आणि 52 हजार 499 रूपये आहे. दोन्ही फोन भारतात ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही माध्यमांद्वारे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

डिस्प्ले आणि कार्यप्रदर्शन फिचर्स

सॅमसंग गॅलेक्सी A57 5G आणि गॅलेक्सी A37 5G स्मार्टफोन्समध्ये 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करणारा 6.7-इंचाचा फुल एचडी+ सुपर AMOLED+ डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले स्मूथ स्क्रोलिंग आणि एक उत्तम व्हिज्युअल अनुभव देतो. हे फोन्स एक्सिनोस प्रोसेसरद्वारे समर्थित आहेत, जे मल्टीटास्किंग आणि गेमिंगसाठी उत्कृष्ट कामगिरी देतात.

दोन्ही डिव्हाइसेसमध्ये आधीपासूनच One UI 8.5 इंस्टॉल केलेले आहे आणि कंपनी सहा जनरेशनपर्यंत अँड्रॉइड अपडेट्स देण्याचे आश्वासन देते. हे वैशिष्ट्य वापरकर्त्यांना फोन अधिक दीर्घकाळ वापरासाठी एक उत्तम पर्याय बनवते.

ऑफर आणि सवलतीचे फायदे

सॅमसंगने या स्मार्टफोन्ससोबत अनेक आकर्षक ऑफर्सही सादर केल्या आहेत. ग्राहकांना 5,000 रूपयांपर्यंतचा अपग्रेड बोनस मिळू शकतो, ज्यामुळे सुरुवातीची किंमत कमी होते.

याव्यतिरिक्त, निवडक बँक आणि UPI व्यवहारांवर 3,000 पर्यंतचा कॅशबॅकही दिला जात आहे. कंपनी 24 महिन्यांचा नो-कॉस्ट EMI चा पर्यायही देत ​​आहे, ज्यामुळे एक रक्‍कमी पेमेंट न करता फोन खरेदी करता येतो. EMI चा पर्याय निवडणाऱ्यांना 3,000 रूपयांचा अतिरिक्त अपग्रेड बोनसही मिळतो.

दोन्ही स्मार्टफोन सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइट, निवडक स्टोअर्स आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. कंपनीने ‘ट्रिपल झिरो’ योजना देखील सादर केली आहे, ज्यामध्ये शून्य डाउन पेमेंट आणि शून्य व्याज दिले जाते. ज्या ग्राहकांना सोप्या EMI मध्ये फोन खरेदी करायचा आहे, त्यांच्यासाठी ही योजना फायदेशीर आहे. याव्यतिरिक्त, ही उपकरणे रिटेल स्टोअर्समध्ये सहज उपलब्ध सुद्धा आहेत.

Follow Us
रोहित पवारांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा; सुप्रिया सुळेंना...
रोहित पवारांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा; सुप्रिया सुळेंना लिहिलेल्या पत्रावर पक्ष चिन्ह नाही अन्...
डिलिमिटेशन विधेयकावरून उद्धव ठाकरे आक्रमक; फडणवीसांना थेट आवाहन,
डिलिमिटेशन विधेयकावरून उद्धव ठाकरे आक्रमक; फडणवीसांना थेट आवाहन, म्हणाले... महाराष्ट्राच्या हक्कांशी तडजोड नको!
मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटल यांना...
Raksha Khadse : मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटलांना दिलं प्रत्युत्तर!
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; मोदी
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; म्हणाले, मोदींचे निर्णय ऐतिहासिक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी दिले स्पष्ट निर्देश!
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बन...
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बनांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधा
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान! नेमकं काय म्हणाले?
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश...
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश जाधव यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, थेट म्हणाले...
विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' राऊतांचा
Sanjay Raut : 'विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' संजय राऊतांचा दावा