
नवी दिल्लीः प्रेमाचा खेळ अजब आहे. एकदा प्रेम (Love) झालं की, ते जात (Cast), धर्म हे काहीही बघत नाही, प्रेम फक्त पाहते ते आपल्या आवडत्या व्यक्तीलाच. एखादी व्यक्ती कधीही कोणाच्याही प्रेमात पडू शकते. प्रेमाला वय नसते, म्हणतात ते खरचं आहे. कारण थायलंडमधील (Thailand) एका 19 वर्षीय मुलाने हे सिद्ध करुन दाखवलं आहे. जो 56 वर्षीय महिलेच्या प्रेमात गडून गेला आहे. तो त्या व्यक्तीच्या प्रेमात इतका गडून गेला आहे की, आता तो तिच्याशी लग्नच करणार आहे. त्याआधी दोघांची एंगेजमेंट झाली असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
या दोघांनी लग्न करण्याआधीच त्यांच्या मॅचमेकिंगचे फोटोही आता इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. त्यामुळे ही अनोखी प्रेमकथा सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरात चर्चेत आली आहे.
द मिररच्या वृत्तानुसार, 19 वर्षीय वुथिचाई चंताराज यांची 56 वर्षीय जानला नमुआंगराक 10 वर्षांची असताना भेट झाली होती. ईशान्य थायलंडच्या साखोन नाखोन प्रांतात हे दोघे शेजारी राहतात.
जानला यांनी घराच्या साफसफाईसाठी वुथिचाय यांची मदत घेतली होती. त्यावेळी हे दोघंही चांगले मित्र बनले. त्यानंतर या दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात कधी झाले ते या दोघांनाही कळले नाही.
दोघांच्या वयात ३७ वर्षांचा फरक आहे, मात्र तरीही हे दोघेही गेल्या दोन वर्षांपासून एकत्रच राहत असल्याचे सांगितले जात आहे.
आपल्या प्रेमाबद्दल वुतिचाय सांगतो की, मी दोन वर्षांपासून जानलासोबत राहत आहे. मी त्याच्या मोडकळीस आलेल्या घराकडे पाहिले, आणि त्यानंतर चांगल्या परिस्थितीत राहण्यासाठी आणि मदत करण्यासाठी विचार करत होते. दोघंही आता एकमेकांबद्दल प्रचंड प्रेमानं वागतात.
56 वर्षाची जानला सांगते की, वुथिचाई चंताराज प्रचंड प्रेमळ आणि मेहनती आहे. तो प्रेम व्यक्त करण्यासाठी कशाचीही मुलाहिजा बाळगत नाही असंही जनला सांगते.
त्यामुळे दोघांचं बाँडिंग इतकं जबरदस्त झालं आहे की, एकमेकांना जाणून घेण्यासाठी ते आता डेट करण्यासाठी नेहमीच बाहेर जात असतात.
या त्यांच्या अनोख्या प्रेमाची कथा आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
त्यामुळे ही दोघंही चर्चेत आली आहेत. त्यांची एंगेजमेंट झाली असल्याने त्यांना सोशल मीडियावरुन अनेकांनी शुभेच्छाही दिल्या आहेत.