AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संत्यानं इग्नोर केलं म्हणून..; ‘धुरंधर’मधील अक्षय खन्नाला पाहून नेटकऱ्यांना आली संतोष जुवेकरची आठवण

'धुरंधर' या चित्रपटामुळे मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर पुन्हा एकदा ट्रोल होतोय. यामागचं कारण म्हणजे 'छावा'च्या प्रमोशनदरम्यान त्याने अक्षय खन्नाच्या भूमिकेबद्दल केलेलं वक्तव्य. आता 'धुरंधर'मुळे अक्षय पुन्हा हिट होत असताना नेटकऱ्यांना संत्याची आठवण आली आहे.

संत्यानं इग्नोर केलं म्हणून..; 'धुरंधर'मधील अक्षय खन्नाला पाहून नेटकऱ्यांना आली संतोष जुवेकरची आठवण
Santosh Juvekar and Akshaye KhannaImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 11, 2025 | 10:10 PM
Share

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरने रायाजींची भूमिका साकारली होती. या चित्रपटानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत संतोषने सेटवर औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अभिनेता अक्षय खन्नाशी बोललोच नाही, असं वक्तव्य केलं होतं. यावरून त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. या ट्रोलिंगवर खुद्द संतोषने स्वत:ची बाजू मांडली होती. आता ‘धुरंधर’मधील अक्षय खन्नाचे सीन्स व्हायरल होत असताना नेटकऱ्यांना पुन्हा एकदा संतोष जुवेकरची आठवण आली आहे. ‘धुरंधर’मधील अक्षय खन्नाचा एक सीन तुफान व्हायरल होत आहे. या सीनमध्ये तो एका अरबी गाण्यावर त्याच्याच खास अंदाजात डान्स करताना दिसत आहे. या क्लिपची तुफान चर्चा होत असतानाच ‘संत्याने याला इग्नोर केलं म्हणे’ असं लिहित नेटकऱ्यांनी मीम्स व्हायरल केले आहेत.

‘आता तरी बघ ना संत्या’, असं एकाने म्हटलंय. तर ‘आता जेव्हा जेव्हा अक्षय खन्ना सुपरहिट होईल तेव्हा संत्या तुझी आठवण काढल्याशिवाय महाराष्ट्र गप्प बसणार नाही’, असं दुसऱ्याने लिहिलं आहे. ‘तू जोपर्यंत बघत नाहीस तोपर्यंत तो फेमस होत राहणार’, अशीही मस्करी एका नेटकऱ्याने केली. ‘मी बघितलाच नाही, बघूच शकतं नाही’, असा संतोष जुवेकरचा डायलॉगसुद्धा अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये लिहिला आहे.

View this post on Instagram

A post shared by chavat (@chavat_memewala_)

संतोष जुवेकर कशामुळे झाला ट्रोल?

‘छावा’ या चित्रपटाच्या सेटवर काम करण्याचा अनुभव सांगताना संतोष जुवेकर एका मुलाखतीत म्हणाला होता, “चित्रपटात ज्यांनी मुघलांच्या भूमिका साकारल्या आहेत, त्या कोणाशीच मी बोललो नाही. औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अक्षय खन्नाच्या काही सीन्सचं शूटिंग सुरू होतं, तेव्हा मी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांना भेटायला गेलो होतो. मी सरांना भेटलो आणि निघालो. त्यांच्या बाजूला अक्षय खन्ना बसला होता. पण मी त्याच्याकडे बघितलंच नाही. माझा त्याच्यावर काही वैयक्तिक राग नाही. पण मला त्याच्याशी बोलावंसं वाटलं नाही.”

या ट्रोलिंगनंतर संतोषने आपली बाजू मांडली होती. “अक्षय खन्ना हा माझाही आवडता अभिनेता आहे. आता ट्रोल झालोय म्हणून असं बोलतोय असं नाहीये. लोक म्हणतील की आता सारवासारव करायला आला. पण लोक अर्धवट गोष्टी ऐकतात किंवा मला जे बोलायचं होतं ते चुकीच्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचलं”, असं जुवेकर म्हणाला होता.

दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं.
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं.
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.