AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video: ब्लड टेस्ट करताना पोलीस अधिकारीच लहान मुलासारखा रडू लागला…

सुई लागल्यावरही अनेकांची भंबेरी उडालेली असते, लहान मुलगा असो किंवा अगदी तगडा तरुण असो सुई म्हटली की सगळ्यांची हलत एकच होते, तर काही माणसं ब्लड टेस्ट देतानाही बेशुद्ध पडणारी आहेत, तर काही जण लहान मुलासारखं रडणारी आणि ओरडणारीही आहेत.

Viral Video: ब्लड टेस्ट करताना पोलीस अधिकारीच लहान मुलासारखा रडू लागला...
| Updated on: Jul 23, 2022 | 2:45 PM
Share

मुंबईः सोशल मीडियावर (Social Media) कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल हे काही सांगता येत नाही. अनेक जणांना अशा व्हिडीओमुळे व्हायरल (Viral Video) होऊन प्रसिद्धी मिळाली आहे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू अनावर झालं आहे. त्याचं कारणही तसंच आहे. ब्लड सँपल देताना एका पोलीस अधिकाऱ्याला (Police Officer)  पळता भुई थोडी झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीयो उत्तर प्रदेशमधील असल्याचे कळते आहे.

View this post on Instagram

A post shared by GiDDa CoMpAnY (@giedde)

 सुई लावण्याआधीच केवढा घाबरला

सुई लागल्यावरही अनेकांची भंबेरी उडालेली असते, लहान मुलगा असो किंवा अगदी तगडा तरुण असो सुई म्हटली की सगळ्यांची हलत एकच होते, तर काही माणसं ब्लड टेस्ट देतानाही बेशुद्ध पडणारी आहेत, तर काही जण लहान मुलासारखं रडणारी आणि ओरडणारीही आहेत. कोविडच्या काळात व्हॅक्सीन घ्यावं लागतं म्हणून झाडावर चढून बसलेले आपण बघितला आहातच. तर आता एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, या व्हिडीओमध्ये एक पोलीस कर्मचारी ब्लड टेस्टिंगची सुई लावण्याआधीच एवढा घाबरला आहे की, जोर जोरात रडू लागला आहे.

लहान मुलासारखा रडू लागला

त्या व्हिडीओमध्ये पोलीस कर्मचारी अगदी लहान मुलासारखा रडू लागला आहे, तर रक्त काढण्यासही तो विरोध करत आहे. हा जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे तो व्हिडीओ आहे उत्तर प्रदेशमधील उन्नावमधील एका पोलीस कँपच्या वेळचा. मेडिकल टेस्टसाठी रक्ताचा नमुना द्यायचा असतो. रक्त घेणारा ज्यावेळी पोलीस कर्मचाऱ्याला खुर्चीवर बसवून सीरिंज घेऊन रक्त घेण्याच्या तयारीत असतो त्यावेळी मात्र पोलीस कर्मचारी आरोग्य सेवकाच्या हातापाया पडत असल्याचे दिसत आहे.

माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.