
हल्ली सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, काहीही सांगता येत नाही. कधी नाचणारी मुलगी, तर कधी खळखळून हसणारा व्यक्ती, कधी एखादे गाणे, तर कधी एखादा पदार्थ… बदलत्या ट्रेंडनुसार सोशल मीडियावर अनेक गोष्टी या व्हायरल होत असतात. पण सध्या सोशल मीडियावर एका लहान मुलाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा लहान मुलगा त्याच्या गोंडस कृतीमुळे नाही तर त्याच्या डोळ्यांमुळे व्हायरल होत आहे. या मुलाच्या डोळ्याचा रंग त्याने परिधान केलेल्या कपड्यांप्रमाणे बदलतो….तुम्हालाही विश्वास बसत नाही ना? पण हे खरं आहे. सध्या या मुलाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील बीसा कॉलनी या ठिकाणी राहणाऱ्या एका मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अर्श असे या मुलाचे नाव आहे. तो दीड वर्षाचा असून सध्या तो सोशल मिडिया स्टार बनला आहे. अर्शच्या डोळ्याचा रंग बदलताना पाहून अनेक लोक आश्चर्यचकित झाले आहेत. अर्शच्या डोळ्याचा रंग तो परिधान केलेल्या कपड्याप्रमाणे बदलतो, असा दावा त्याचे कुटुंब करत आहे. अर्शच्या डोळ्याच्या रंगामुळेच तो स्टार बनला आहे. त्याला पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली आहे.
सध्या अर्शचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अर्श हा करड्या रंगाचे कपडे घालून दिसत आहे. त्यावेळी त्याचे डोळे करड्या रंगाचे आहे. त्यानंतर त्याला काळ्या रंगाचे कपडे परिधान करताच अचानक त्याच्या डोळ्याचा रंग काळा झाला. यानंतर त्याने हिरवे कपडे घातले तर त्याच्या डोळ्यांचा रंगही हिरवा होताना दिसत आहे. त्याचा डोळ्याचा सतत बदलणार रंग पाहून अनेक लोक याला दैवी चमत्कार असल्याचे समजू लागले आहेत.
अर्शच्या डोळ्याच्या रंगाबद्दल सतत चर्चा केली जात आहे. त्याला सतत कुणी खेळणी, कुणी मिठाई आणि चॉकलेट्स घेऊन देत आहेत. त्याच्या डोळ्यांचा रंग बदलताना व्हिडीओही काढत आहेत. तर काहीजण त्याच्यासोबत सेल्फी घेत आहेत. अर्शला ही देवाची देणगी मिळाली आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे. याबद्दल डोळ्यांचे तज्ज्ञ डॉक्टर अखिलेश अग्रवाल यांनी हा निव्वळ भ्रम आहे. पण अर्शचे कुटुंबीय याला निसर्गाचा चमत्कार मानतात, असे म्हटले आहे.
लोकांच्या मनात कुतूहल निर्माण
अर्शच्या डोळ्याचा रंग अचानक कसा बदलतो हे आता एक गूढ बनले आहे. या घटनेने लोकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले आहे. पण त्यासोबतच पण विज्ञान आणि निसर्ग यांच्यात किती आश्चर्यकारक घटना घडू शकतात, याचा विचार करायला लावत आहेत