VIDEO : मांजरीची घसरगुंडीवर मस्ती, व्हिडिओ पाहून तुम्हालाही बालपणीचे दिवस आठवतील!

सोशल मीडियावर दररोज प्राण्यांचे हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या एका क्यूट मांजरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. ही मांजर लहान लेकरांसारखी घसरगुंडी खेळताना दिसत आहे. यूजरला हा व्हिडीओ खूप आवडला असून यूजर या व्हिडीओवर कमेंट करत हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत.

VIDEO : मांजरीची घसरगुंडीवर मस्ती, व्हिडिओ पाहून तुम्हालाही बालपणीचे दिवस आठवतील!
व्हायरल व्हिडीओ
| Edited By: | Updated on: Jan 02, 2022 | 11:29 AM

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) दररोज प्राण्यांचे हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या एका क्यूट मांजरीचा (Cat) व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. ही मांजर लहान लेकरांसारखी घसरगुंडी खेळताना दिसत आहे. यूजरला हा व्हिडीओ खूप आवडला असून यूजर या व्हिडीओवर कमेंट करत हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. या व्हिडीओमधून मांजरीचा क्यूटनेस दिसतो आहे.

मांजरीचा घसरगुंडी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल 

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक बाग आहे आणि तिथे एक घसरगुंडी आहे. ही काळ्या रंगाची मांजर त्या घसरगुंडीवर जाण्याचा प्रयत्न करते आहे. मात्र, अर्ध्यातूनच ती घसरून खाली येते आहे. पण हे करताना त्या मांजरीला अतिशय मजा येत आहे. यामुळे ही पुन्हा-पुन्हा तेच करते आहे आणि आनंद घेते आहे.

हा मजेदार व्हिडिओ ट्विटरवर @buitengebieden_ नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे आणि ‘कॅट स्लाइड’ असे कॅप्शन लिहिले आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 70 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 5900 हून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक देखील केले आहे. त्याचबरोबर अनेकांनी व्हिडिओवर मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, ‘व्हिडिओच्या शेवटी मांजरीला समजले की तिला कोणीतरी पाहात आहे.

संबंधित बातम्या : 

VIDEO : इवल्याशा चिमुकलीने केले शास्त्रीय नृत्य, लोक म्हणाले हे तर देवाचेच गिफ्ट…पाहा खास व्हिडीओ!

Video : सेंच्युरियनमधील विजयानंतर विराट कोहली, राहुल द्रवीडचा हा भन्नाट डान्स व्हायरल