Video : सेंच्युरियनमधील विजयानंतर विराट कोहली, राहुल द्रवीडचा हा भन्नाट डान्स व्हायरल

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: दादासाहेब कारंडे, Tv9 मराठी

Updated on: Jan 01, 2022 | 11:42 PM

विराट कोहलीबरोबर हॉटेलचा स्टाफई नाचू लागल्यानंतर द्रवीडला दम धरवला नाही, तोही या व्हिडिओत मागे कोपऱ्यात नाचताना दिसून येत आहे.

Video : सेंच्युरियनमधील विजयानंतर विराट कोहली, राहुल द्रवीडचा हा भन्नाट डान्स व्हायरल

मुंबई : टीम इंडिया सध्या साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे, टीम इंडियाचा हा दौरा अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला. या दौऱ्याआधीच टीम इंडियात मोठे बदल झाले आहेत. या दौऱ्याआधी विराट कोहलीकडून वनडे आणि टी-20 चे कर्णधारपद काढून घेत, कर्णधारपदाची माळ रोहित शर्माच्या गळ्यात टाकल्यानेही हा दौरा चर्चेत राहिला. त्यानंतर बीसीसीआय विरुद्ध विराट कोहली हाही वाद दिसून आला, मात्र हा दौरा चर्चेत आलाय एका भन्नाट कारणासाठी, कारण पहिल्या कोसटीत विजय मिळाल्यानंतर कोच राहुल द्रवीड आणि कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली थिरकताना दिसून येत आहे.

राहुल आणि विराटचा धतिंग डान्स

आपण अनेकदा विराट कोहलीला डान्स करताना अनेक व्हिडिओतून पाहिले असेल, हाच विराट कोहली साऊथ आफ्रेतही हटके स्टाईलने डान्स करताना दिसून आला आहे. भारतीय टीमने पहिल्या कसोटीत यजमान साऊथ आफ्रिकेचा घाम काढत त्यांना त्यांच्याच घरात घुसून चारीमुंड्या चीत केले, त्यामुळे कर्णधार कोहली आणि कोच राहुल द्रवीडच्य आनंदाला पारावर उरला नाही. पहिला विजय मिळवून टीम इंडिया हॉटेलमध्ये परतल्यावर टीम इंडियाच्या जंगी स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. यावेळी विराट कोहली तर नाचलाच मात्र राहुल द्रवीडला डान्स करताना लोकांनी क्वचितच पाहिले असेल.

विराट कोहलीबरोबर हॉटेलचा स्टाफई नाचू लागल्यानंतर द्रवीडला दम धरवला नाही, तोही या व्हिडिओत मागे कोपऱ्यात नाचताना दिसून येत आहे. कोरोनाकाळात टीम इंडियाच्या या दौऱ्याबद्दल सुरूवातीला धाकधूक निर्माण झाली होती, मात्र पक्के नियोजन करत टीम इंडिया साऊथ आफ्रिकेत दाखल झाली आणि पहिला सामना खेळून जिकलाही, त्यामुळे क्रिकेट फॅन्ससह खेळाडुंमध्येही उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. त्यामुळेच क्रिकेटच्या चाहत्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे.

‘हार्दिक भाई डिलिव्हरी बहुत फास्ट देते हैं’, नताशा स्टॅन्कोविक पुन्हा प्रेग्नेंट का?

Explained: परदेशात भारतीय गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीमागे ‘ही’ प्रमुख तीन कारणं

IND vs SA: काल जंगी सेलिब्रेशन, आज वाँडरर्सवर टीम इंडियाने गाळला घाम

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI