AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | जगातील सर्वात महागडे अंडरवॉटर हॉटेल, समुद्राखालील जग पाहून व्हाल अचंबित

जगातील सर्वात महागड्या समुद्राखालील अंडरवॉटर हॉटेलच्या एका व्हिडिओने इंटरनेटवरील सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या हॉटेलचा व्हिडीओ पाहून सारे युजर्स मंत्रमुग्ध झाले आहेत. सोशल मिडीया इन्फ्लुएंसर कपल कारा आणि नॅट यांनी या समुद्राखालील हॉटेलचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

Video | जगातील सर्वात महागडे अंडरवॉटर हॉटेल, समुद्राखालील जग पाहून व्हाल अचंबित
the muraka underwater hotel
| Updated on: Mar 14, 2024 | 1:44 PM
Share

मुंबई | 14 मार्च 2024 : समुद्राखालील जग पाहायला आपण उत्सुक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. अलिकडेच समाजमाध्यमावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात समुद्राखालील रहस्यमयी सफर पाहायला मिळत आहे. जगातील सर्वात महागड्या अंडरवॉटर हॉटेलातील एका व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधले आहे. हा व्हिडीओ पाहून युजर्स मंत्रमुग्ध झाले आहेत. सोशल मिडीया इन्फ्लुएंसर दाम्पत्याने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर अपलोड केला आहे. कारा आणि नॅट या दाम्पत्याने हा व्हिडीओ समाजमाध्यमावर शेअर केला असून त्याला भरपूर लाईक्स मिळत आहेत.

व्हायरल व्हिडिओची सुरुवातीलाच समुद्राच्या आत जाणाऱ्या लिफ्टमधून होत आहे. नॅट आपल्याला हॉटेलचा रस्ता दाखवत असल्याचे आपल्याला दिसत आहे. लिफ्टमधून बाहेर पडताच, नॅट एका हॉलमध्ये प्रवेश करतो, नंतर एका आलिशान बेडरूमकडे आपल्याला तो नेतो. हा एक लक्झरी किंग साइज बेड आहे, या आलिशान बेडरुममध्ये पर्सनल बसण्याची जागा, सेन्सर-संचलित शौचालय, वॉटर-ग्लास सिलिंग आणि समुद्राच्या आतील सुंदर दृश्य तुम्हाला मोहीत करतील. समुद्राच्या खालील असलेल्या या हॉटेलला तुम्हालाही भेट द्यावी असे वाटेल. या व्हिडिओला शेअर करताना कॅप्शन दिली आहे की, ‘काय तुम्ही इथे राहाल का?’

येथे पाहा व्हिडीओ –

View this post on Instagram

A post shared by Kara and Nate (@karaandnate)

इंस्टाग्रामवर या व्हिडिओला 70 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिले गेले आहे आणि या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. या हॉटेलमध्ये याआधी राहीलेल्या एका प्रवाशाने लिहिले, ‘मी इथे या खोलीत राहिलो होतो, थोडा नर्व्हस होतो, पण हा एक सुंदर अनुभव होता.’ अन्य एका युजरने लिहिले, ‘कल्पना करा की जेव्हा रात्रीची वेळ असेल आणि येथे अंधार असेल, तुमच्या आजूबाजूला काय आहे हे माहीती नसता तुम्ही येथे झोपू शकता का?’ तिसऱ्या एका युजरने लिहिलेय की अंडरवॉटरची मला भीती वाटते.

समुद्रपासून 16 फूट खाली आहे

‘द मुराका’ नावाचे हे आलिशान दुमजली हॉटेल मालदीव येथील कॉनराड मालदीवच्या रंगाली आयलंड रिसॉर्टमध्ये आहे. वेबसाइट ‘द डायजेस्ट ऑनलाइन’च्या मते हे हॉटेल समुद्रपातळीपासून 16 फूट खाली आत आहे, 180-डिग्रीच्या घुमटाखाली याचे मास्टर बेडरूम आहे. या हॉटेलमध्ये 24-तास बटलर आणि शेफ, स्पा सेंटर, ऑन-कॉल फिटनेस ट्रेनर आणि वैयक्तिक जेट स्की अशा सुविधा आहेत.

टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर.
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक.
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद.
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....