3 फुटात 3 मजली ‘पॅलेस’, लोक इंजीनिअरच्या शोधात
तुम्ही घर, बंगले, उंचच उंच इमारती पाहिल्या असतील पण आज आम्ही तुम्हाला एक अशीच अनोखी वास्तू दाखवणार आहोत. तुम्ही ही वास्तू पाहिली की आधी इंजिनिअरला शोधून त्याचा कौतुक कराल. या अभियंत्याने 3 फूट जागेवर 3 मजली घर बांधले आहे.

अधिकाधिक कमाई करून स्वत:साठी एक सुंदर मोठं घर विकत घ्यावं, ज्यात आलिशान आयुष्य जगता येईल, अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी ते कोणत्याही प्रकारच्या मेहनतीपासून किंवा कशापासूनही मागे हटत नाहीत. तुम्ही लोकांना छोट्या घरातून मोठ्या घरात शिफ्ट होताना पाहिलं असेल, पण आज आम्ही तुम्हाला असं घर दाखवणार आहोत ज्याला तुम्ही घरही म्हणू शकत नाही.
वास्तूचे वेगवेगळे प्रकार तुम्ही पाहिले असतील, पण आज आम्ही तुम्हाला जे दाखवणार आहोत, तसा वास्तूचा नमुना तुम्हाला क्वचितच दिसेल. येथे या व्यक्तीने 3 फूट जागेवर 3 मजली घर बांधले. एक अनोखे आणि अत्यंत अरुंद घर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे. या घराची खास गोष्ट म्हणजे त्याचे कलर कॉम्बिनेशन आहे, ज्यामुळे ते अधिक आकर्षक बनते.
या व्हायरल व्हिडिओमध्ये गुलाबी आणि निळ्या रंगातील एक छोटेसे घर दिसत आहे. बाहेरून खेळण्यासारखं दिसतं, पण पूर्ण तीन मजली घर आहे. गुलाबी रंगाच्या या घराची डिझाईन खूप वेगळी असून दरवाजाच्या जागी शटर आहे. घरात छोटी खोली, पायऱ्या आणि आवश्यक सुविधा आहेत. ते इतकं अरुंद आहे की ते पाहिल्यानंतर अनेकांना प्रश्न पडतो की त्यात कुणी कसं जगू शकतं?
हा व्हिडिओ पाहा
View this post on Instagram
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर smart_amroha नावाच्या अकाऊंटने हा व्हिडिओ शेअर केला आहे. यावरून हे घर अमरोहा येथे बांधलेले असल्याचे दिसून येते. 6 दिवसांपूर्वी शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला जवळपास 1.1 कोटी लोकांनी पाहिलं आहे, तर 3 लाखांहून अधिक लोकांनी तो शेअर केला आहे. लोकांनी यावर एकापेक्षा एक कमेंटही केल्या आहेत. एका युजरने याला आर्किटेक्चरचा चमत्कार म्हटले तर दुसऱ्या युजरने याला अमरोहाचा कुतुब मिनार असे संबोधले. ते पाहूनच गुदमरत असल्याचे काहींनी सांगितले.
अनेकदा आपल्याला घर बांधायचं असतं पण मोठं घर आपण बांधू शकत नाही. अनेकांना अगदी छोट्या जागेत ते व्यवस्थित बांधावं लागतं. विशेष म्हणजे छोट्या जागेत घर बांधणाऱ्यांची संख्या देखील अधिक आहे. अशातच हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. कुणी कौतुक केले आहे तर कुणी यावर हशा पिकवला आहे. तर कुणी हे घर बनवणाऱ्याचे तोंडभरुन कौतुक केले आहेत.
