AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चिमुरड्यानं केला इंजिनिअर्सचा घोर अपमान..! पाहा Viral Video

एका लहान मुलाचा मजेदार व्हिडिओ व्हायरल (Viral) होतोय, व्हिडिओमध्ये एक मूल मोठं झाल्यानंतर इंजिनिअर (Engineer) बनण्याचं स्वप्न पाहत आहे. त्या मुलाला अभियंता व्हायचं आहे, कारण त्याला वाटतं की अभियंते अभ्यास करत नाहीत.

चिमुरड्यानं केला इंजिनिअर्सचा घोर अपमान..! पाहा Viral Video
Viral/अभ्यास करताना चिमुरडा
| Edited By: Pradeep Garad | Updated on: Jan 07, 2022 | 11:50 AM
Share

प्रत्येक मुलाचं काहीतरी बनण्याचं स्वप्न असतं. लहानपणापासूनच मोठं झाल्यावर काय व्हायचं याचा विचार करतात. लहानपणापासून ते त्या कामात गुंतलेलं असतं, ज्याची त्याला आवड असते. कितीतरी मुलंही लहानपणापासून पालकांना सांगतात, की त्यांना मोठं झाल्यावर काय करायचं आहे. आता याच संबंधातला एका लहान मुलाचा मजेदार व्हिडिओ व्हायरल (Viral) होतोय, व्हिडिओमध्ये एक मूल मोठं झाल्यानंतर इंजिनिअर (Engineer) बनण्याचं स्वप्न पाहत आहे. त्या मुलाला अभियंता व्हायचं आहे, कारण त्याला वाटतं की अभियंते अभ्यास करत नाहीत. होय, व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तो मुलगा स्वतःच असं बोलताना दिसतोय.

रडायला लागतो मुलगा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये मुलाची आई त्याला शिकवत असल्याचं दिसून येतं आणि मग तो काहीतरी ऐकून रडू लागतो. त्याची आई बराच वेळ अभ्यास करण्याचा आग्रह धरते, पण मुलाला शाळेत अर्धा तास अभ्यास करायचा आहे, असे म्हणत नाही. तेव्हा त्याची आई म्हणते, की तू अभ्यास केलास तरच डॉक्टर, पोलीस बनशील. हे ऐकून मुलगा रडायला लागतो आणि म्हणतो, की त्याला इंजिनियर व्हायचंय. कारण अभियंते अभ्यास करत नाहीत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय.

View this post on Instagram

A post shared by Meme wala (@memewalanews)

इंजिनिअर्सची उडवतायत खिल्ली रडणाऱ्या मुलाच्या या व्हिडिओला लोक लाइक करत आहेत आणि इंजिनिअर्सची खिल्ली उडवताहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोक म्हणाले, की भाऊ, तुम्ही मुलांना असं का शिकवता, इंजिनिअर होण्यासाठीही तुम्हाला अभ्यास करावा लागतो. दुसऱ्या यूझरनं लिहिलंय, मूल बरोबर बोलत आहे. तिसऱ्या यूझरनं लिहिलंय, लहान मुलांना किती माहिती असतं, हा व्हिडिओ खरोखर गंमतीदार आहे.

हजारो लाइक्स आणि कमेंट्स हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. memewalanews नावाच्या पेजवर तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाइक्स आणि कमेंट्स पाहायला मिळत आहेत. त्यामुळे त्याची संख्या आणखीनच वाढतेय. या व्हिडिओचा कमेंट सेक्शनदेखील हसणाऱ्या इमोजींनी भरला आहे. मुलांचे व्हिडिओ येताच ते इंटरनेटवर व्हायरल होत असतात.

Video : ओह..! सोशल मीडियावर Viral होत असलेला व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही गोंधळून जाल

Viral : ट्रेनमध्ये बिनधास्त झोपताय का? रेल्वेच्या डब्यातला हा Video पाहा, हसून हसून पोट दुखेल

Jawed Habib Contro Video : आधी डोक्यावर पचकन थुंकला आणि आता जावेद हबीब म्हणतो…

Follow Us
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा खुलासा
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा कुणबी प्रमाणपत्राबाबत मोठा खुलासा!
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... भावेश कावरेचं मोठं विधान
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... ब्रोकर भावेश कावरे ठाकरेंच्या भेटीनंतर नेमकं काय म्हणाला?
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर, व्हिडीओच आला समोर
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्...
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्... पोलिसांनीच मारहाण केल्याच्या आरोपाने मोठी खळबळ
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी...
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी तरी लाज शिल्लक असेल तर...
लातूरमधील घटना: रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू
लातूरमधील खासगी रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू, नातेवाईकांकडून निष्काळजीपणाचा आरोप
रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत काय घडलं?
Maratha Arakshan | रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
आता काय ट्र्म्प येऊन मनमाड रस्त्यांचं काम करणार का? भाजपच्या...
आता काय ट्र्म्प येऊन मनमाड रस्त्यांचं काम करणार का? भाजपच्या मिश्किल वक्तव्यावर बड्या नेत्याचा बोचरा सवाल!
भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का; युतीमध्येच विश्वासू नेते...
भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का; युतीमध्येच विश्वासू नेते... शिवसेना शिंदे गटात खळबळ, काय घडलं?
नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजना दरम्यान मोठा ट्विस्ट; चक्क...
नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजना दरम्यान मोठा ट्विस्ट; पंतप्रधान, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोसह चक्क...