Viral Video: केवळ टॉवेल गुंडाळून तरुणी रस्त्यावर आली, पुढे तिने असे केले की धक्का बसेल…
रस्त्यावर टॉवेल गुंडाळून डान्स केलेल्या अभिनेत्री काजोलला तुम्ही पाहीलेच असेल परंतू एक रशियन तरुणी चक्क रिअल लाईफमध्ये अशी टॉवेल गुंडाळुन रस्त्यावर पाहून अनेकांना धक्का बसला, तिला पाहून काही महिला तर डोकं फिरलंय का असे हाताने इशारे करीत खुणवत आहेत.

सोशल मीडियावर आजकाल काहीही व्हायरल होत आहे. परंतू नेटिजन्सचे अटेंशन्स मिळविण्यासाठी एका मुलीने तर सर्व हद्दच ओलांडली. रशियन कंटेंन्ट क्रिएटर दानेलिया खासानोव्हा ( Daneliya Khassanova ) हीने असे काही केली की इंटरनेटवर चांगलाच हल्ला माजला.तिने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ रिल्स शेअर केली आहे. या रशियन तरुणीला रस्त्यावर अंघोळ करण्यासाठी टॉवेलमध्ये आलेले पाहून इंटरनेटवर वातावरण तापलंय…
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की दानेलिया केवळ एक टॉवेलला लपेटून रस्त्यांवर फिरत आहे. एवढेच नाही रस्त्यावर तिने केसांना शॅम्पू लावायलाही सुरुवात केली. तिला पाहून रस्त्यांवरुन चालणाऱ्या महिला देखील हैराण होत परस्परांत गप्पा मारु लागल्याचे दिसत आहेत, काही महिला तर तिला पाहून डोकंबिकं फिरलंय का ? असे हाताने इशारे करीत तिला सांगत आहेत. परंतू दानेलिया तिच्यात मस्तीत चालताना दिसत आहे. असे वाटते की तिला या महिलांचं काय कुणाचेच काही पडलेले नाहीए….तिला वाटतंय की तिच्या बाथरुम्समध्येच आहे.
यानंतर जे घडते ते आणखी आश्चर्यचकीत आहे. दानेलिया रस्त्यावरच एका अनोखळी महिलेकडे पाण्याची बाटली मागते. आणि आपल्या केसांना धुण्यास सुरु करते. अन्य एक महिला आरसा पकडून तिचा मेकअप करायला मदत करीत आहे. हे पाहून महिलांच्या प्रतिक्रीया पाहण्यासारख्या आहेत. तर काही महिलांनी तिला थांबवत तिच्या डिओचा स्प्रे स्वत:वर फवारून पाहायला मिळते आहे..
येथे पाहा व्हिडीओ –
View this post on Instagram
व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की दानेलिया जेव्हा हे सर्व प्रकार करत असते तेव्हा आजूबाजूला उभे असणारे लोक तिला हैराण होऊन टक लावून पाहात असतात. त्यापैकी काही लोक तर मोबाईल काढून हे दृश्य रेकॉर्ड करायला लागतात. परंतू या कहानीत तेव्हा जोरदार ट्विस्ट येतो जेव्हा ही तरुणी अंगाभोवती गुंडाळलेला टॉवेल चक्क फिरकावून देते… त्यावेळी तरुणांच्या प्रतिक्रिया या पाहण्यासारख्या आहेत…
दानेलिया हीने इंस्टाग्राम वर @feyasdisneya या व्हिडिओला शेअर करीत कॅप्शन लिहीलेय की , जेव्हा तुम्ही डेटसाठी लेट होता..तिचा हा अंतरंगी अवतार सोशल मीडियावर हिट झाला आहे. या पोस्टवर नेटिजन्स जोरदार प्रतिक्रीया देत आहेत. काही लोकांनी यास प्रसिद्धीचा स्टन्स्ट असे म्हटले आहे. काही लोकांनी यास अटेंशन मिळवण्याचा प्रकार म्हटले आहे. तर काही जर या तरुणीच्या बिनधास्त अंदाजाचे दिवाने बनले आहेत.
युजरच्या प्रतिक्रीया –
एका यूजरने लिहिलेय की या मुलीच्या कॉन्फिडेंसची कमाल आहे. दूसरे एका यूजरने म्हटलंय की मुलीच्या धाडसाचे कौतूक करावे तेवढे कमी आहे, असे करण्यासाठी देखील जिगर लागते. तर एकाने म्हटलंय की हल्ली स्वातंत्र्य आणि आधुनिकतेच्या नावाखाली लोकही काही हास्यास्पद कामे करीत आहेत.
