AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video: MRI मशिनला घाबरत होता चिमुरडा, मग बापाने जे केलं, सावलीसारखा सोबत झोपला….

आई-वडील आपल्या मुलांसाठी वाटेल ते साहस आणि धाडस कष्ठ करायला तयार असतात. एका बापलेकाचा इमोशनल व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात पिता मुलाला कसा आधार देतोय हे पाहून लोक भावूक होत आहेत.

Viral Video: MRI मशिनला घाबरत होता चिमुरडा, मग बापाने जे केलं, सावलीसारखा सोबत झोपला....
MRI Machine
| Updated on: Mar 31, 2026 | 4:30 PM
Share

मुलांसाठी पालक काही करायला तयार होत असतात. त्यांच्या भविष्यासाठी खस्ता खात असतात. असाच एका बापलेकाचा एक इमोशनल व्हिडीओ व्हायरल होत आहे. अनेक जण हॉस्पिटलमध्ये जायला घाबरत असतात. एमआरआय मशिनमध्ये जाण्यासाठी तर मोठी माणसे देखील बिचकत असतात. अशाच एका मुलाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओत एक लहान मुलगा एमआरआय स्कॅनला प्रचंड घाबरला आहे. मशिनचा घाबरवणारा आवाज पाहून मुलगा रडत आहे. त्याला भीती वाटत असते की या मशिनमध्ये आपल्याला काय झाले तर काय करायचे. त्यामुळे यामुलाचे हातपाय बांधले जातात. यानंतर काय होते हे तुम्ही देखील पाहाल तर इमोशनल व्हाल….

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात. तर काही विचार करायला लावणारे असतात. असाच एक भावूक करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दिसते एक पिता आपल्या मुलाच्या काळजीसाठी कोणतेही पाऊल उचलू शकतो. या व्हिडीओने अनेक जण भावनिक होतील. बापलेकाचे नाते काय असते याची जाणीव होईल.

मुलाच्या ओठांवर हसु यावे आणि त्याला कोणते दु:ख होऊ नये यासाठी पालक त्यांची किती काळजी घेत असतात.त्यांना अगदी फुलांसारखे जपत असतात. या व्हिडीओ एक बाप मुलासाठी काय करु शकतो याचे चित्रण आहे.व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की एक मुलगा एमआरआय मशिनमध्ये जाण्यास घाबरत आहे. एमआरआय मशिनचा तो विचित्र आवाजपाहून तो घाबरत आहे. त्याला एकट्याला या मशिनमध्ये टाकणार आहेत. हे पाहून तो आणखीनच घाबरतो आणि तो मशिनमध्ये जाण्यास नकार देत आहे. अखेर पिता एक शक्कल लढवतो.

जेव्हा पिता बनला ढाल

वडिलांना आपल्या काळजाच्या तुकड्याचा जराही त्रास पाहावत नाही. मुलगा एमआरआय मशिनमध्ये जात नाही हे पाहून या पित्याने जे केले ते पाहून सर्वात हृदय जिंकले आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की पित्याने आधी मुलाला एमआरआय बेडवर झोपवले. नंतर स्वत: देखील त्याला आधार देण्यासाठी झोपला. नंतर आपल्या मुलाला बिलगून पित्याने आधार दिला. व्हिडीओत दिसते की दोघे एकत्र एमआरआय मशिनमध्ये गेले.

येथे पाहा व्हिडीओ –

असे म्हटले जात आहे. संपूर्ण प्रक्रिये दरम्यान पिता मुलाला आधार देत राहिला. आणि त्याला भिती वाटू नये म्हणून त्याच्या सोबत झोपला. काही क्षणात वडील आपल्या सोबत आहेत हे पाहून घाबरणारा मुलगा शांत झाला. या व्हिडीओ पाहून युजरने प्रतिक्रीया दिल्या आहेत की जगासाठी ते केवळ एक पिता-वडील आहेत. आपल्या मुलांसाठी ते सर्वस्व आहेत.

Follow Us
कोर्टातील युक्तिवाद संपवण्याआधी... ठाकरेच्या वकीलांची मोठी मागणी
कोर्टातील युक्तिवाद संपवण्याआधी... ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांची कोर्टाकडे मोठी मागणी
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अंबाझरी तलावाची पाहणी, नागपूरच्या वैभवाल
अंबाझरी तलावाचे पुनरुज्जीवन, पर्यटन आणि जलक्रीडा केंद्र म्हणून विकासाची फडणवीस यांची घोषणा
मराठा आरक्षणासाठी दातेंच्या उपोषणाची धार कायम
मराठा आरक्षणासाठी राजेंद्र दातेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस
मनसे विद्यार्थ्यांच्या पाठीशी
अमित ठाकरे यांचा सडेतोड इशारा; मुलींना हात लावाल तर मार खाणारच
आमच्याकडे अधिकार आहेत यात... कोर्टाची सर्वात मोठी टिप्पणी, नेमकं...
आमच्याकडे अपात्र करण्याचे अधिकार आहेत, यामध्ये... कोर्टाची सर्वात मोठी टिप्पणी, नेमकं निरिक्षण काय?
मुंबईत ऑटो, टॅक्सी चालकांसाठी आरटीओची मराठी भाषा तपासणी मोहीम
मुंबईत आरटीओची कारवाई: ऑटो, टॅक्सी चालकांना मराठी भाषेची सक्ती
दादरमध्ये अमराठी टॅक्सी चालकांची पोलिसांकडून तपासणी, दंडवसुलीमुळे...
दादरमध्ये अमराठी टॅक्सी चालकांची पोलिसांकडून तपासणी, दंडवसुलीमुळे चालकांमध्ये संताप
ठाकरेंना सर्वात मोठा धक्का! कालच बैठक घेतली अन् आज ठाकरेंच्या नगरसेवका
ठाकरेंना सर्वात मोठा धक्का! कालच बैठक घेतली अन् आज ठाकरेंच्या नगरसेवकांनी... अखेर ज्याची भीती तेच घडलं
लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या मुलांना... अभिजीत दीपके यांचा संताप
Abhijeet Dipke | लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या मुलांना... अभिजीत दीपके यांचा संताप, नेमकं काय घडलं?
थोड्याच वेळात शिवसेना चिन्हावर सुनावणी, इतक्यात वकील सरोदेंचं वक्तव्य
अध्यक्षांनी साक्ष, पुरावे, प्रश्नोत्तरे सगळंच... थोड्याच वेळात शिवसेना पक्ष चिन्हावर सुनावणी, इतक्यात वकील असीम सरोदेंचं विधान चर्चेत