Viral Video : शांतपणे उभ्या असलेल्या मुलीवर माकडानं केला हल्ला, बाकीची मुलं घाबरली

Viral Video : शांतपणे उभ्या असलेल्या मुलीवर माकडानं केला हल्ला, बाकीची मुलं घाबरली
माकड

सोशल मीडिया(Social Media)वर माकडां(Monkey)च्या खट्याळपणाचे अनेक व्हिडिओ (Video) आपण पाहिले असतील. आज आम्ही तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहोत, ज्यामध्ये माकड शाळेत प्रार्थना सुरू असताना अचानक एका मुलीवर हल्ला करतं.

प्रदीप गरड

|

Jan 16, 2022 | 3:30 PM

सोशल मीडिया(Social Media)वर माकडां(Monkey)च्या खट्याळपणाचे अनेक व्हिडिओ (Video) आपण पाहिले असतील. माकड हा असा प्राणी आहे, जे कुठंही हल्ला करू शकतात. या प्राण्यांना पाहून लहान मुलंही घाबरतात. बहुतेक लोकांना माकडांनी ओरबाडण्याची भीती वाटते. आज आम्ही तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहोत, ज्यामध्ये माकड शाळेत प्रार्थना सुरू असताना अचानक एका मुलीवर हल्ला करतं.

मुलीला झाली दुखापत

व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. व्हिडिओमध्ये एक माकड एका मुलीवर हल्ला करताना दिसतंय. या हल्ल्यामुळे मुलगी खाली पडली. मुलगी ज्या पद्धतीनं जमिनीवर पडली, त्यावरून तिला दुखापत झाली असावी, असं दिसतं.

सुरू असते प्रार्थना

व्हिडिओमध्ये पाहा, एक मुलगी इतर विद्यार्थिनींसोबत शाळेच्या मैदानात उभी आहे. सर्व मुली रांगेत उभ्या असल्यानं शाळेत प्रार्थनेचा तास सुरू असल्याचं दिसतं. ज्या मुलीवर हल्ला झाला, ती व्हिडिओमध्ये मागच्या बाजूला उभी असलेली दिसतेय. दरम्यान, कुठूनतरी एक माकड धावत येतं आणि शांतपणे उभ्या असलेल्या या मुलीवर हल्ला करतं. हा पूर्ण व्हिडिओ पाहू या…

माकडानं ढकललं

माकड त्या मुलीला मागून जोरात ढकलत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय. त्यानंतर ते मागे धावतं. तर दुसरीकडे माकडाच्या हल्ल्यामुळे मुलगी जमिनीवर कोसळते. व्हिडिओमध्ये दिसतंय, की मुलगी खाली पडताच इतर सर्व मुली तिच्याकडे पाहायला लागतात आणि घाबरतात.

View this post on Instagram

A post shared by salu (@shalini_shukla_143)

‘माकडापासून नेहमी दूर राहावं’

व्हिडिओ पाहून सोशल मीडिया यूझर्सही अचंबित झाले आहेत. काही यूझर्स म्हणतात, की माकडापासून नेहमी दूर राहावं. त्याचवेळी असा अचानक हल्ला झाल्यावर काय करता येवू शकतं, हेही काहीजण सांगत आहेत. shalini_shukla_143 नावाच्या यूझरनं हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.

Viral : यूझर्सना भावला मांजरीचा ‘किलर कम इमोशनल’ लूक, पुन्हा पुन्हा पाहाल ‘हा’ Video

Shocking : …आणि अचानक कोसळतो पूल, हा Viral Video पाहून अंगावर काटा येईल

Video : ‘बाहुबली’च्या गाण्यावर चिमुरडीचा अप्रतिम क्लासिकल डान्स; हावभाव पाहून लोक म्हणाले, अप्रतिम, अद्भुत..!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें