Video: लग्नाच्या स्टेजवरच नवरा-नवरी भिडले, वरमाला घालताना झटापट, नेटकरी हसून लोटपोट

आजच्या इंटरनेटच्या युगात सगळं मोबाईलच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड होतं, तो व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड होतो आणि पाहाता पाहात हा व्हायरल होतो. असाच एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये नवरा नवरीमधील गोड प्रसंग नाही तर एक तिखट प्रसंग दाखवण्यात आला आहे.

Video: लग्नाच्या स्टेजवरच नवरा-नवरी भिडले, वरमाला घालताना झटापट, नेटकरी हसून लोटपोट
लग्नाच्या स्टेजवरच नवरा नवरी भिडले


सोशल मीडियाचे जग लग्नाचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत असतात. असे व्हिडीओ नेटकऱ्यांना खूप आवडतात. वधू वरामधील काही गोड प्रसंग असो, वा वऱ्हाड्यांच्या करामती, आजच्या इंटरनेटच्या युगात सगळं मोबाईलच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड होतं, तो व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड होतो आणि पाहाता पाहात हा व्हायरल होतो. असाच एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये नवरा नवरीमधील गोड प्रसंग नाही तर एक तिखट प्रसंग दाखवण्यात आला आहे. (Viral video of bride and groom clashed during the Varamala people will shocked after see this)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये वधू -वर स्टेजवर पोहचतात. एकमेकांच्या गळ्यात वरमाला टाकण्याचा विधी असतो. पण इथंच गडबड होते. ही गडबड पाहून सगळेजण हसायला लागतात. मात्र, वधू आणि वरामध्ये पेटलेलं भांडण प्रत्येकाला कळत असतं. हा व्हिडीओ जुना असून पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विवाह सोहळ्यात वधू आणि वर एकमेकांना हार घालण्यासाठी आतूर आहेत, त्यातच कोण कुणाला हार घालेल याचा ताळमेळ बसत नाही, आणि एकाच वेळी दोघेही एकमेकांच्या गळ्यात हार टाकतात. हार तर काही गळ्यात पडत नाही, उलट दोन्ही हार एकमेकांमध्ये गुंततात, आणि सगळ्या हारांचा सत्यानाश होतो. हार घालताना वधूवर इतके रागात दिसत आहेत की, असं वाटतं कित्येक जन्मापासूनचे एकमेकांचे शत्रू असतील. हार घालता तर येत नाही, पण तरीही एकमेकांकडे रागाने पाहात राहतात. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हिडीओ पाहा:


हा मजेदार व्हिडिओ लोकांना सोशल मीडियावर खूप आवडत आहे. एकाने कमेंटमध्ये लिहिले, ‘जर आतापासून ही परिस्थिती असेल तर लग्नानंतर त्यांचे काय होईल.’ तर दुसऱ्याने लिहिले, ‘हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी हसू थांबवू शकत नाही.’ याशिवाय, आणखी बरेच जण इमोजीजद्वारे आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

हेही पाहा:

Video: असे देसी जुगाड, जे पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल, भारतात जुगाट टेक्नॉलॉजीची कमी नाही

Video: हत्तीच्या पिलाला Z++ सुरक्षा, रस्त्यावरुन चालणाऱ्या हत्तींच्या कळपाचा व्हिडीओ पाहून नेटकरी खूश

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI