VIDEO : व्हायरल व्हिडिओमधल्या या ट्रेनला आग नाही लागली, तर सजवलंय! UKमधला व्हिडिओ होतोय व्हायरल

VIDEO : व्हायरल व्हिडिओमधल्या या ट्रेनला आग नाही लागली, तर सजवलंय! UKमधला व्हिडिओ होतोय व्हायरल
ख्रिसमसनिमित्त सजवलेली रेल्वे (हॅम्पशायर, UK)

आज नाताळ (Christmas) आहे. हा विशेष सण जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. भारतात जसा दिवाळी(Diwali)चा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तसाच ख्रिसमस(Christmas)ही.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रदीप गरड

Dec 25, 2021 | 12:00 PM

आज नाताळ (Christmas) आहे. हा विशेष सण जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. भारतात जसा दिवाळी(Diwali)चा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तसाच ख्रिसमस(Christmas)ही. विशेषत: या दिवशी ते ख्रिसमस ट्री सजवतात आणि त्याच वेळी घर इत्यादी दिवे लावून सजवतात. जर तुम्ही फक्त घरातच नाही तर रेस्टॉरंट वगैरेमध्ये गेलात तर तुम्हाला ख्रिसमस ट्रीदेखील दिसतील आणि संपूर्ण रेस्टॉरंट वेगवेगळ्या प्रकारच्या दिव्यांनी उजळून निघालेलं असतं. सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असले तरी या खास प्रसंगी एक अतिशय सुंदर व्हिडिओ व्हायरल होतोय, यामध्ये एक ट्रेन पूर्णपणे ख्रिसमसच्या दिव्यांनी सजलीय. हे ‘अद्भुत’ दृश्य लोकांना खूप आवडलंय.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की एक ट्रेन आधीच रुळावर उभी आहे आणि एक ट्रेन लगतच्या रुळावर येत आहे, ते पाहून असं दिसतं, की त्या ट्रेनला आग लागलीय आणि ती न थांबता जळतेय. खरं तर ही एक वाफेच्या इंजिनाची ट्रेन आहे, जी पूर्णपणे ख्रिसमसच्या दिव्यांनी सजलेलीए आणि म्हणूनच ट्रेनकडे पाहिल्यावर असं वाटतं, की तिला आग लागलीय आणि धूर निघतोय. हा नेत्रदीपक व्हिडिओ आयएएस अधिकारी डॉ. एमव्ही राव यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केलाय आणि कॅप्शन लिहिलंय, ‘ख्रिसमसच्या दिव्यांनी सजलेली वाफेची लोकोमोटिव्ह ट्रेन’. हा व्हिडिओ कुठला आहे, हेही त्यांनी कॅप्शनमध्ये सांगितलंय. त्यांच्या मते हे विहंगम दृश्य हॅम्पशायर, UKचं आहे.

हा व्हिडिओ आतापर्यंत 3 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला. तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाइकही केलंय. त्याचबरोबर अनेकांनी या व्हिडिओवर उत्तम कमेंट्सही केल्या आहेत. एका यूजरनं लिहिलंय, ‘सर खूप सुंदर’, तर दुसऱ्या यूजरनं लिहिलंय, ‘खूप छान! अद्भुत’. त्याचप्रमाणे आणखी एका युजरनं ‘मला वाटलं, की हा हॅरी पॉटरचा सीन आहे’, अशा कमेंट्स केल्यात.

VIDEO : सायकलवरच लावलं ब्लेंडर! ज्यूस करण्याचं अफलातून जुगाड; सोशल मीडियावरचा हा व्हिडिओ पाहाच

Righty or Lefty? | जगात फक्त 10 टक्के लोकच डावखुरे असून त्यामागचं कारणही खूपच इंटरेस्टिंग आहे!

‘काय करु? दारु सुटतच नाही!’ हीच तुमचीही समस्या? सगळ्यात आधी मानसिकता बदला

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें