Video: असा चोर होणे नाही!, चोरीचा हा सीसीटीव्ही पाहून नेटकरी पोट धरुन हसले.

हा व्हिडिओ एका गल्लीतला आहे. जिथं चोर चोरी करण्यासाठी रस्त्यावर फिरताना दिसतो. तो असं काही वागतो की, तो तिथे चोरी करायला आला आहे असा कोणालाही संशय येणार नाही.

Video: असा चोर होणे नाही!, चोरीचा हा सीसीटीव्ही पाहून नेटकरी पोट धरुन हसले.
चोरी करतानाचा सीसीटीव्ही व्हिडीओ

चोर फक्त संधी शोधत असतात आणि संधी मिळताच ते हात साफ करतात. दिवसाढवळ्या आणि लोकांच्या गर्दीतही चोर हातचलाखी दाखवतात, बरेचदा चोर असे काही करतात. जे पाहिल्यानंतर आपण आश्चर्यचकित होतो. सध्या चोराशी संबंधित असाच एक व्हिडिओ लोकांसमोर आला आहे. जो पाहिल्यानंतर नेटकरी अवाक झाले आहेत. (Viral video of thief stole the bicycle people were shocked after watching this)

हा व्हिडिओ एका गल्लीतला आहे. जिथं चोर चोरी करण्यासाठी रस्त्यावर फिरताना दिसतो. तो असं काही वागतो की, तो तिथे चोरी करायला आला आहे असा कोणालाही संशय येणार नाही. चोराची ही सर्व कृती तिथं असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे, आणी हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक चोर चोरी करण्याचा खूप प्रयत्न करत आहे. खरंतर तो सायकल चोरायचा प्रयत्न करत असतो, पण चोरी करण्यापूर्वी तो एवढा वेळ तिथं घिरट्या घालतो, की लोकांना वाटतं, तो बाईक चोरी करेल. हा व्हिडिओ मजेदार बनवण्यासाठी, बॅकग्राउंडमध्ये मनी हाईस्ट या वेबसीरिजमधील बेला चावचं म्युझिक वाजवण्यात आलं आहे.

पाहा व्हिडीओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by GiDDa CoMpAnY -mEmE pAgE- (@giedde)

मोबाईल चोराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून लोक कमेंट्सद्वारे आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘भावाने चांगलीच हातचलाखी दाखवली.

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर ‘giedde’ नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. ज्यासोबत पेज अॅडमिनने एक मजेशीर कॅप्शनही लिहिलं आहे. हा व्हिडिओ इतका मजेदार आहे की लोक तो पुन्हा पुन्हा पाहत आहेत आणि इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत.

हेही पाहा:

Video: बाहुबली बनण्याच्या नादात “खाली डोकं वर पाय”, तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी लोटपोट

Video: मृत्यूचा दाढेत फसला, लाथ मारुन बाहेर पडला, पोहणाऱ्यावरील मगरीच्या हल्ल्याच्या व्हिडीओ व्हायरल

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI