Video: मृत्यूचा दाढेत फसला, लाथ मारुन बाहेर पडला, पोहणाऱ्यावरील मगरीच्या हल्ल्याच्या व्हिडीओ व्हायरल

तुम्हाला वाटेल असं काय आहे या व्हिडीओत, तर हा व्हिडीओ एका अशा माणसाचा आहे, जो मृत्यूच्या जबड्याला लाथ मारुन परत आला आहे.

Video: मृत्यूचा दाढेत फसला, लाथ मारुन बाहेर पडला, पोहणाऱ्यावरील मगरीच्या हल्ल्याच्या व्हिडीओ व्हायरल
पोहणाऱ्यावर मगरीचा हल्ला

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीसुद्धा आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाहीत, तुम्हालाही वाटेल की, असं खरंच घडू शकते का? आता तुम्हाला वाटेल असं काय आहे या व्हिडीओत, तर हा व्हिडीओ एका अशा माणसाचा आहे, जो मृत्यूच्या जबड्याला लाथ मारुन परत आला आहे. (Man swimming in the river suddenly crocodile attacked people were shocked to see this)

जिला पाण्यातील बेताज बादशाह म्हटलं जातं, त्या मगरीचा हा व्हिड़ीओ आहे. मगर पाण्यात क्षणाचाही विलंब न करता कुणालाही आपला शिकार बनवते. तिच्या सत्तेला पाण्यात आव्हान देणे कुणाचंही काम नाही. कारण भूक लागल्यावर ती पाण्यातील धोकादायक प्राण्यांनाही आपली शिकार बनवते, पण कधी कधी या मगरीचा हल्लाही निकामी ठरतो. असाच काहीसा प्रकार समोर आला आहे

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती नदीत आनंदाने पोहत आहे, पण तेवढ्यात एक मगर त्याच्या मागून येतो आणि त्याला शिकार बनवण्याचा प्रयत्न करते, ती त्याला पाण्याखाली घेऊन जाते. पण त्या व्यक्तीचे नशीब साथ देते, पाण्यात हात-पाय जोरात मारतो, मगरीला हा व्यक्ती थोडा जड वाटतो, आणि मगर या व्यक्तीला सोडून देते.

व्हिडीओ पाहा:

 

View this post on Instagram

 

A post shared by طبیعت (@nature27_12)

हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘कुणी सोबत असल्याशिवाय नदीत पोहायला जाऊ नये.’ तर दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘भाऊ! मृत्यूच्या जबड्यातून वाचला, नशिबवान आहेस.’ याशिवाय इतरही अनेक युजर्सनी या व्हिडिओवर कमेंट करून आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर nature27_12 नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे. वृत्त लिहेपर्यंत या व्हिडिओला 34 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

हेही पाहा:

Viral Video: प्राण्यांची चेष्टा करण्याआधी शंभरदा विचार करा, नाहीतर काय होतं पाहा…

Video: गाडीतून उतरला आणि थेट 11 वाघांच्या कळपात गेला, पुढं जे झालं त्याने नेटकरी आवाक, चीनमधला व्हिडीओ व्हायरल

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI