Viral Video: प्राण्यांची चेष्टा करण्याआधी शंभरदा विचार करा, नाहीतर काय होतं पाहा…

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती घरात पाळीव कुत्र्यासोबत मस्ती करत आहे. आपल्या कुत्र्याला छेडण्यासाठी तो वारंवार त्यांची मुठ त्यांच्यासमोर उघडतो आणि बंद करतो.

Viral Video: प्राण्यांची चेष्टा करण्याआधी शंभरदा विचार करा, नाहीतर काय होतं पाहा...
पाळीव कुत्र्याशी मस्ती करणं महागात
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: VN

Oct 27, 2021 | 11:40 AM

अनेकदा तुम्ही पाहिले असेल की लोक त्यांच्या पाळीव प्राण्यांसोबत खूप मजा करतात. कधीकधी प्राणी देखील ही मजा खूप घेतात, परंतु कधीकधी जेव्हा त्यांचा मूड ठीक नसतो, तेव्हा त्यांच्याशी खेळणं अंगलट येऊ शकते. असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हीही प्राण्यांसोबत मजा करण्यापूर्वी शंभर वेळा विचार कराल. (man having fun with dog suddenly he bite owner people were shocked to see this)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती घरात पाळीव कुत्र्यासोबत मस्ती करत आहे. आपल्या कुत्र्याला छेडण्यासाठी तो वारंवार त्यांची मुठ त्यांच्यासमोर उघडतो आणि बंद करतो. तो कधी तर्जनी तर कधी अंगठा दाखवून कुत्र्याला चिडवतो. असे दिसून येते की, ती व्यक्ती कुत्र्याकडे मधले बोट दाखवताच तो लगेच चावतो.

व्हिडीओ पाहा:

View this post on Instagram

A post shared by hepgul5 (@hepgul5)

हा व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांना खूप पसंत केला जात आहे. अनेक युजर्सनी या व्हिडिओवर कमेंट करून आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘हा माणूस पुढच्या वेळी कुत्र्यांना चिडवण्याआधी शंभर वेळा विचार करेल.’ तर दुसर्‍या यूजरने लिहिले की, ‘प्राण्यांचाही मूड असतो म्हणून अशी चेष्टा करू नये.’ या व्हिडीओवर अनेक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत.

हा मजेदार व्हिडिओ इन्स्टाग्रामवर hepgul5 नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे. ज्यासोबत त्याने मजेशीर कॅप्शन लिहिले आहे. बातमी लिहिपर्यंत या व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत.

हेही पाहा:

Video: विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनविभागाची कसरत, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Video: दारावर बेल नाही, तर फणा काढून बसलेला नाग, लोक म्हणाले, या घरात जाण्याची रिस्क चोरही घेणार नाही!

 

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें