AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20I World Cup 2026 : वानखेडेत विजयी सुरुवातीनंतरही दुसर्‍या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल, कुणाचा पत्ता कट?

Icc T20i World Cup 2026 : आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत विजयी सुरुवात करणाऱ्या संघाने दुसऱ्या सामन्यासाठी अंतिम 11 खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. दुसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये विजयानंतरही 1 बदल करण्यात आलाय.

T20I World Cup 2026 : वानखेडेत विजयी सुरुवातीनंतरही दुसर्‍या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल, कुणाचा पत्ता कट?
Wankhede Stadium Mumbai T20I World Cup 2026Image Credit source: @ajinkyasnaik X Account
| Updated on: Feb 10, 2026 | 5:56 PM
Share

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचा आजचा (10 फेब्रुवारी) चौथा दिवस आहे. या स्पर्धेतील पहिल्या 3 दिवसात एकूण 9 सामने खेळवण्यात आले आहेत. या 9 सामन्यांत प्रमुख संघांनी विजय मिळवलाय. मात्र तुलनेत नवख्या असणार्‍या संघांनी आपली ताकद दाखवून दिलीय. कायमच या नवख्या संघांना लिंबुटिंबु म्हणून गृहीत धरलं जातं. मात्र या लिंबुटिंबु संघांनी पहिल्या 3 दिवसांत आपली छाप सोडली. नेदरलँड्स, यूएसए आणि नेपाळ या 3 संघांनी पाकिस्तान, टीम इंडिया आणि इंग्लंड या सारख्या वर्ल्ड कप विजेत्या संघाला घाम फोडला.

पाकिस्तान, टीम इंडिया आणि इंग्लंड या तिन्ही संघांनी नेदरलँड्स, यूएसए आणि नेपाळला पराभूत करत स्पर्धेत विजयी सलामी दिली. या संघांना आपल्या पहिल्याच सामन्यात पराभूत व्हावं लागलं. मात्र यांनी प्रमुख संघांना जेरीस आणलं. या तिन्ही संघांनी आपल्या कामगिरीची क्रिकेट चाहत्यांना दखल घेण्यास भाग पाडलं.

पाकिस्तानला नेदरलँड्स विरुद्ध विजयी धावांचा पाठलाग करताना शेवटच्या षटकात विजय मिळवता आला. यूएसएने भारताला झटपट झटके देत बॅक फुटवर ढकललं होतं. मात्र कॅप्टन सूर्यकुमार यादव याने केलेल्या खेळीच्या जोरावर भारताला विजय मिळवता आला. तर नेपाळ क्रिकेट टीमने रविवारी 8 फेब्रुवारीला इंग्लंडला रडवून सोडलं. नेपाळचा 185 धावांचा पाठलाग करताना शेवटच्या चेंडूवर पराभव झाला. नेपाळचा पराभव झाला मात्र त्यांनी चाहत्यांची मनं जिंकली.

इंग्लंडने नेपाळवर अवघ्या 4 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर आता इंग्लंड दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिज विरुद्ध भिडणार आहे. हा सामना बुधवारी 11 फेब्रुवारीला होणार आहे. इंग्लंडने या सामन्यासाठी नेहमीप्रमाणे 24 तासांआधी प्लेइंग ईलेव्हन जाहीर केलीय.

इंग्लंडकडून प्लेइं ईलेव्हनमध्ये 1 बदल

इंग्लंडने प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 बदल केला आहेत. ल्यूक वूड याचा पत्ता कट करण्यात आला आहे. तर वूडच्या जागी जेमी ओव्हरटन याचा समावेश करण्यात आला आहे. इंग्लंड क्रिकेटने सोशल मीडियाद्वारे प्रसिद्धीपत्रकातून याबाबतची माहिती दिली आहे.

जेमी ओव्हरटन इन, ल्यूक वूड आऊट

वेस्ट इंडिज विरूद्धच्या सामन्यासाठी इंग्लंडची प्लेइंग ईलेव्हन : फिल साल्ट, जोस बटलर (विकेटकीपर), जेकब बेथेल, टॉम बँटन, हॅरी ब्रूक (कर्णधार), सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर आणि आदिल रशीद.

अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा.
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल.
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब.
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान.
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य.
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?.
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट.
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ.
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ट्रॅफिक पोलिस सरसावले
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ट्रॅफिक पोलिस सरसावले.
नार्वेकरांना अधिकार देणं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेची धुरा डाकू....
नार्वेकरांना अधिकार देणं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेची धुरा डाकू.....