
सोशल मिडीयावर अनेक व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. अशातच लग्नाशी संबंधित सुद्धा गंमतीशीर व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात पाहिली जातात. आपण अनेकदा पाहतो की, एखाद्या बेस्ट फ्रेंडचे लग्न असेल तर इतर मित्रांच्या आनंदाला पारावर राहत नाही. मित्राच्या लग्नात काय करू काय नाही असे होते. मात्र अनेकदा अतिउत्साहात एखादी गोष्ट कॅमेऱ्यात कैद केली जाते, आणि जी सोशल मीडियावर व्हायरल होताच चर्चेचा विषय बनते. लग्नाशी संबंधित असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वर लग्न मंडपात विधीसाठी बसला असताना मित्रं असं काही करतात जे सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाले असून व्हिडीओ पाहायल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अर्थातच तुम्ही असा विचार करत असाल की मित्रांच्या लग्नात वराचे मित्र चार-चांद लावल्याने ओळखले जातात. मात्र सोशल मिडीयावर धुमाकूळ घालणाऱ्या या व्हिडीओमध्ये वरासोबत त्याच्या मित्रांनी असे काय केले की ज्यामुळे नेटकरी खूप संतापले. तर या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये नवरदेव हा वधूसोबत लग्न मंडपात विधी करीता बसलेला दिसत आहे. लग्नाच्या विधी सुरू आहेत. दरम्यान या ठिकाणी वराचा एक मित्र मंडपात येतो आणि वराला एक फ्रूटी प्यायला देतो.
खरं तर वराच्या मित्रांनी या फ्रूटीमध्ये दारू मिक्स केलेली होती आणि ती प्यायल्यानंतर वराला ते समजले आणि वर पुढचा घोट घेण्यास नकार देतो. व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे वराच्या मित्रांनी फ्रूटीमध्ये दारू इंजेक्शनच्या सहाय्याने मिक्स करताना दिसत आहे. तर हा व्हिडीओ @_abirbiswas94 या इन्स्टा हँडलवरून शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडीओ शेअर केल्यानंतर इंटरनेटवर धुमाकूळ घातला असून हा व्हिडीओ 6.4 कोटी वेळा पाहिला गेला आहे, तर कमेंट सेक्शन कमेंट्सनी भरलेला आहे. बहुतेक नेटकऱ्यांनी त्यांच्या मित्रांच्या या कृतींवर संताप्त व्यक्त केला आहे.
काही लोकांनी या व्हिडीओला हलका विनोद म्हणून घेतले, तर अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या मित्रांना या कृत्याबद्दल फटकारले आहे. एका यूजर्सने कमेंट केली आहे की, भाऊ, असं कोणाशीही करू नकोस. तो पूजेला बसला आहे आणि लग्न हा विनोद नाहीये. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, जेव्हा असे मित्र असतात तेव्हा शत्रूंची काय गरज असते. तर आणखीन एका युजरने लिहिले, अशा मूर्खांमुळे लग्न मोडतात.
हा व्हिडिओ आपल्याला विनोद आणि निष्काळजीपणा यांच्यातील कसा असू शकतो याचा विचार करायला लावतो. मित्रांसोबत विनोद करणे आणि मजा करणे याला स्वतःचे स्थान आहे, परंतु काही प्रसंगी गंभीर असणे देखील महत्त्वाचे आहे. कारण अशा कृतींमुळे वातावरण बिघडू शकते.