Video: मुलीसमोर कोब्रा, तरी कॅमेऱ्याला पोझ देत फोटोग्राफी, पाहा सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ

आता हा व्हिडिओ पहा जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगी कोब्रा साप समोर बसलेला असताना पोज देत आहे. अनेकांना हा व्हिडीओ पाहून आश्चर्य वाटलं आहे.

Video: मुलीसमोर कोब्रा, तरी कॅमेऱ्याला पोझ देत फोटोग्राफी, पाहा सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ
या व्हिडिओमध्ये एक मुलगी कोब्रा साप समोर बसलेला असताना पोज देत आहे.

अशी कल्पना करा की तुम्ही तुमच्या लॉनवर बसलेले आहात आणि तेवढ्यात तुम्हाला एक कोब्रा साप तुमच्या समोर बसलेला दिसतो. ज्याने आपला फना काढलेला आहे. तेव्हा तुम्हाची रिएक्शन काय असेल? नक्कीच काहीजण तातडीने त्या जागेवरुन उठतील आणि इकडे तिकडे पळतील. पण असेही काही लोक आहेत जे बहुधा सापांना घाबरत नाहीत. आता हा व्हिडिओ पहा जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगी कोब्रा साप समोर बसलेला असताना पोज देत आहे. अनेकांना हा व्हिडीओ पाहून आश्चर्य वाटलं आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी कोब्रा सापाच्या मागे अतिशय बिनधा्स्त कॅमेऱ्याला पोझ देत आहे. या दरम्यान, कोब्रा देखील कॅमेराकडे आपले फना पसरवतो आहे. इतका विषारी आणि जगातील सर्वात धोकादायक साप असूनही ही मुलगी घाबरत नाही. व्हिडिओमध्ये ती मुलगी हसताना दिसते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही मुलीच्या धाडसाचे कौतुक कराल. (Viral Video The girl kept posing behind the cobra snake Left Netizens amazed)

पाहा व्हिडीओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by Royal Pythons (@royal_pythons_)

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर royal_pythons नावाच्या खात्यासह शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना युजरने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘हे आश्चर्यकारक आहे.’ हा व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांना खूप आवडत आहे. व्हिडिओ शेअर केल्यापासून आतापर्यंत 4 हजारांहून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे. त्याच वेळी, शेकडोंनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

एकाने कमेंट केली की, ‘अरे देवा, हा साप खूप धोकादायक आहेत.’ त्याचवेळी, दुसऱ्याने लिहलं, , ‘मला समजत नाही की ही मुलगी कोब्रा सापासमोर खूप आरामात आणि शांतपणे कशी बसू शकते. याशिवाय अनेकाना यावर इमोजीज वापरुन प्रतिक्रिया दिल्या आहे.

हेही पाहा:

तब्बल 51 वर्षांपूर्वी हरवलेलं पाकिट अमेरिकेच्या पोलिसांनी शोधलं, पाकिट उघडताच व्यक्तीला आश्चर्याचा धक्का!

Video: दुबईतील प्रसिद्ध हॉटेलसमोर वाघासोबत स्टंट, नेटकरी भडकले, कमेंट्समध्ये नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त

 

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI