तब्बल 51 वर्षांपूर्वी हरवलेलं पाकिट अमेरिकेच्या पोलिसांनी शोधलं, पाकिट उघडताच व्यक्तीला आश्चर्याचा धक्का!

या व्यक्तीला सुमारे 51 वर्षांनंतर त्याचे हरवलेले पाकीट (Wallet) सापडलं. चांगली गोष्ट म्हणजे त्याची सर्व आवश्यक कागदपत्रं, लायसन्स वॉलेटमध्येच आहेत.

तब्बल 51 वर्षांपूर्वी हरवलेलं पाकिट अमेरिकेच्या पोलिसांनी शोधलं, पाकिट उघडताच व्यक्तीला आश्चर्याचा धक्का!
1970 मध्ये हरवलेलं वॉलेट आता सापडलं

हरवलेल्या वस्तू सापडणं (Lost Goods) हे नशिब उघडल्यासारखंच असतं. अमेरिकेत (America) राहणाऱ्या व्यक्तीचंही नशीबही असंच अचानक जागं झाले, पण त्याला खूप वेळ लागला. या व्यक्तीला सुमारे 51 वर्षांनंतर त्याचे हरवलेले पाकीट (Wallet) सापडलं. चांगली गोष्ट म्हणजे त्याची सर्व आवश्यक कागदपत्रं, लायसन्स वॉलेटमध्येच आहेत. वॉलेट मिळाल्याबद्दल ही व्यक्ती आनंदी तर आहे, पण त्याला वाटतं की, जर पोलिसांनी अजून मेहनत घेतली असती, तर ते वेळेत मिळालं असतं. (Police in the United States have found a lost wallet after 51 years)

1970 मध्ये हरवलं वॉलेट

‘न्यूयॉर्क पोस्ट’च्या बातमीनुसार, ही घटना अमेरिकेच्या कॅन्सस (Kansas State) राज्यातील आहे. पोलिसांनी सांगितले की, 1970 मध्ये एका व्यक्तीचं वॉलेट हरवलं होतं. त्यावेळी, खूप शोधाशोध केल्यानंतरही पोलिसांना ते सापडलं नाही, पण आता वॉलेट सापडली आहे. मात्र, वॉलेट कुठे सापडलं हे ग्रेट बेंड पोलिसांनी सांगितले नाही. वॉलेटमध्ये सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे पोलिसांनी त्याचा मालक लॉरेन्सचा शोध घेतला आणि त्यांना ते परत केलं.

पाकीट हरवल्याचंही विसरला होता व्यक्ती

जेव्हा पोलिसांनी लॉरेन्सशी संपर्क साधला, तेव्हा त्यांना घटना आठवायला वेळ लागला कि आपलं असं काही हरवलं होतं. पण जेव्हा त्यांनी हे वॉलेट पाहिलं, तेव्हा त्यांच्या सगळं लक्षात आलं. लॉरेन्स आश्चर्य वाटलं की, पाकिटातील अनेक कागदपत्रे अजूनही चोरीच्या वेळी होती तशीच आहेत. सिटीझन सेक्युरिटी कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स सारखी सर्व कागदपत्रं या पाकीटात जशीच्या तशी होती.

हाताने बनवलेले पाकीट

ग्रेट बेंड पोलीस विभागाने (Great Bend Police Department) सांगितले की, एक पाकिट नुकतंच जप्त करण्यात आलं आहे, ज्यात सिटीझन सेक्युरिटी कार्ड आणि वाहन परवाना यासह अनेक वस्तू आहेत. परवाना 1974 मध्येच संपला. यानंतर अधिकाऱ्यांनी पर्सच्या मालकाशी संपर्क साधून ती त्यांना दिली. त्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले की, 1970 च्या दशकात त्याची ही हस्तनिर्मित पर्स कुठेतरी हरवली होती. त्याने तक्रारही केली होती, पण पर्सचा कोणताही मागमूस लागला नाही.

हेही पाहा:

Video: दुबईतील प्रसिद्ध हॉटेलसमोर वाघासोबत स्टंट, नेटकरी भडकले, कमेंटमध्ये नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त

Video: ना कुठला मेकअप, ना भारी ड्रेस, एका स्मितहास्याने तिने नेटकऱ्यांची मनं जिंकली, पाहा पाकिस्तानी मुलीचा व्हिडीओ

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI