
सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर दररोज हजारो-लाखो व्हिडीओ (ट्रेंडिंग व्हिडिओ) शेअर होत असतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. काही व्हिडीओ असे असतात की त्यांच्यावर विश्वास ठेवणे कठीण होते. कारण, या व्हिडीओमध्ये एक महिला सापाला लिप किस करताना दिसत आहे, ज्याने हा नजारा पाहिला तो थक्क होऊन पाहतच राहिला.
जगात असे अनेक लोक आहेत, ज्यांना खतरनाक खेळ खेळायला खूप आवडते. यासाठी काही लोक आपला जीवही पणाला लावतात. सोशल मीडियावर तुम्हाला असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतील. मात्र, काही लोक छंदाच्या नादात जीवाशी खेळतात. या व्हायरल व्हिडीओमध्येही तुम्हाला असेच काहीतरी पाहायला मिळेल. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक महिला खूपच अनोख्या पद्धतीने सापाला लिप किस करत आहे. ज्या पद्धतीने ती सापाला किस करत होती, तिच्या चेहऱ्यावर अजिबात भीती दिसत नव्हती. सापाला पाहिल्यावर सामान्यतः लोक घाबरतात काहींना तर घामच फुटतो.
वाचा: माझा ऑटोग्राफ घेण्यासाठी संजीव कुमार माझ्या घरी आले होते; महागुरुंनी सांगितला किस्सा
सापाला लिप किस
व्हिडीओमध्ये महिला घरातच दिसत आहे. तिने सुंदर असा ड्रेस घातला आहे. त्यावर मोत्याची ज्वेलरी घातली आहे. तिने सापाला हातात घेतलं आहे. नंतर ती सापाला किस करते. तो सापही तिच्या ओठांजवळ शांतपणे बसतो.
नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया
हा नजारा पाहून तुम्हीही नक्कीच थक्क झाला असाल. इन्स्टाग्रामवर हा धक्कादायक व्हिडीओ ‘lauraisabelaleon’ या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर हजारो लोकांनी तो लाइक केला आहे. यासोबतच, मजा घेत लोक या व्हिडीओवर कमेंट्सही करत आहेत. कोणीतरी म्हणतंय, सापासोबत असं कोण करतं? कोणीतरी म्हणतंय, छंद ही मोठी गोष्ट आहे.