आता गुगल डूडलवर झळकू शकतं तुमचंही नाव, ते कसं? जाणून घ्या A टू Z माहिती

आता गूगल डूडलमध्ये तुमचं नाव किंवा मनपसंद मजकूर लिहिता येतो. यासाठी लागणारं Chrome Extension आहे My Doodle. हे एक्सटेंशन वापरणं अगदी सोपं आहे आणि काही स्टेप्समध्ये तुम्ही हे करू शकता

आता गुगल डूडलवर झळकू शकतं तुमचंही नाव, ते कसं? जाणून घ्या A टू Z माहिती
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 11, 2025 | 9:56 PM

गुगल डूडल (Google Doodle) ही एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येक इंटरनेट वापरकर्त्याला आकर्षित करते. कधी गणेश चतुर्थी, कधी एखाद्या महान वैज्ञानिकाची जयंती, तर कधी कोणत्यातरी ऐतिहासिक घटनेची आठवण गूगलचं रंगीत, सर्जनशील डूडल नेहमीच चर्चेचा विषय ठरतं. पण तुम्ही कल्पना करू शकता का की हेच डूडल आता तुमच्या नावाने झळकू शकतं? होय, गूगल क्रोममधील एका खास एक्सटेंशनच्या मदतीने हे शक्य झालं आहे!

गुगल डूडलचा इतिहास थोडक्यात

पहिलं गुगल डूडल 1998 मध्ये ‘आउट ऑफ ऑफिस’ मेसेज म्हणून वापरलं गेलं होतं. मात्र पुढे ते गूगलच्या सर्जनशील ओळखीचा एक भाग बनलं. आता गूगल विविध देशांतील महत्त्वाच्या घटनांनुसार डूडल तयार करतं. प्रत्येक देशात वेगळं डूडलही दिसू शकतं. विशेष म्हणजे, यासाठी वापरकर्ते आपले कल्पना डूडल टीमकडे ईमेलने पाठवू शकतात.

पर्सनल डूडल

आता गूगल डूडलमध्ये तुमचं नाव किंवा मनपसंद मजकूर लिहिता येतो. यासाठी लागणारं Chrome Extension आहे My Doodle. हे एक्सटेंशन वापरणं अगदी सोपं आहे आणि काही स्टेप्समध्ये तुम्ही हे करू शकता:

My Doodle कसं वापरायचं?

1. सर्वप्रथम Google Chrome उघडा आणि सर्च बारमध्ये “Chrome extensions” टाइप करा.

2. जेव्हा Chrome Web Store दिसेल, तिथे “My Doodle” सर्च करा.

3. “My Doodle” एक्सटेंशनवर “Add to Chrome” क्लिक करा. नंतर “Add Extension” ला परवानगी द्या.

4. आता ब्राउजरवर एक आयकॉन दिसेल. त्यावर क्लिक करून “My Doodle” ऑप्शन निवडा.

5. त्यात तुमचं नाव किंवा आवडता मजकूर टाइप करा.

6. तुम्ही हवं असल्यास इमेज URL देऊन तुमचं खास डिझाइन तयार करू शकता.

7. तसेच स्क्रीनवर घड्याळही सेट करू शकता.

या सोप्या पद्धतीमुळे आता कुणालाही स्वतःचा खास Google Doodle बनवता येतो तेही विनामूल्य! सोशल मीडियावर शेअर करून तुम्ही तुमच्या मित्रांनाही हे करून दाखवू शकता. गूगल डूडलसारख्या प्रसिद्ध गोष्टीवर आपलं नाव झळकणं, हे निश्चितच एक वेगळं समाधान देणारा क्षण आहे.