AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ग्रेटेस्ट जेनरेशनपासून जेन बीटापर्यंत… कोणत्या वयाच्या पिढीला काय म्हटलं जातं? या गोष्टी माहीतच हव्यात

सरकार पाडण्याची शक्ती असणारे जेन झी म्हणजे काय? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. वेगवेगळ्या काळात जन्मलेल्या लोकांना कोण कोणत्या संज्ञा आहेत याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ग्रेटेस्ट जेनरेशनपासून जेन बीटापर्यंत... कोणत्या वयाच्या पिढीला काय म्हटलं जातं? या गोष्टी माहीतच हव्यात
Genration Name
| Updated on: Sep 13, 2025 | 7:35 PM
Share

नेपाळमधील जेन झी म्हणजेच जनरेशन झेड आंदोलकांनी देशातील सरकार पाडले आहे. जेन झी समुदायाने या आंदोलनाचे नेतृत्व केले. त्यामुळे सरकार पाडण्याची शक्ती असणारे जेन झी म्हणजे काय? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. जेन झी ही राजकीय, सामाजिक किंवा सांस्कृतिक संघटना नाही, ही एका पिढीसाठी वापरली जाणारी संज्ञा आहे. ही संज्ञा काय आहे? यात कोणत्या तरुणांचा समावेश होतो? वेगवेगळ्या काळात जन्मलेल्या लोकांना कोणकोणत्या संज्ञा आहेत याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

जेन झी म्हणजे काय?

जनरेशन झेड किंवा जेन झी म्हणजे 1997 ते 2012 या काळात जन्मलेली मुले. या 15 वर्षात जन्मलेल्या पिढीला जनरल झेड म्हणतात. सध्या जगात जेन झी ची लोकसंख्या सुमारे 30 टक्के आहे. म्हणजेच ही तरूण लोकसंख्या आहे, ज्यांच्यावर जगाला पुढे नेण्याची जबाबदारी आहे. या पिढीच्या कामाचा किंवा आंदोलनाचा परिणाम समाज आणि अर्थव्यवस्थेवर होताना दिसत आहे.

जेन झी ही पिढी इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या युगात मोठी झाली आहे, हे लोक केवळ तंत्रज्ञानाने नव्हे तर सामाजिक मुद्द्यांवर जागरूक आणि सक्रिय आहेत. ही सर्वात जास्त चर्चेत असणारी पिढी आहे. तंत्रज्ञानाच्या काळात हे लोक नवीन अॅप्स आणि सोशल मीडियावरील ट्रेंड खूप लवकर स्वीकारतात.

पैसे वाचवण्यात अग्रेसर

जेन झी पिढी केवळ सोशल मीडियावर नव्हे तर भविष्याच्या दृष्टीने खूप सतर्क आहे. एका सर्वेक्षणानुसार जवळपास 2 तृतीयांश जेन झी तरुणांनी 19 वर्षांच्या वयात बचत करायला सुरुवात केली. या पिढीसमोर नोकऱ्यांमधील अस्थिरता घर खरेदीची चिंता आणि वाढता खर्च ही आव्हाणे आहेत. या पिढीमध्ये उत्पन्न वाढवण्यासाठी अतिरिक्त काम करण्याचा ट्रेंड वाढला आहे. या समाजाचा मोबाइलवर जास्त विश्वास आहे. हे लोक डेस्कटॉपपेक्षा मोबाईलवर जास्त काम करतात. 80 टक्क्यांपेक्षा जास्त लोक ऑनलाईन उत्पादने खरेदी करण्यावर विश्वास ठेवतात.

या पिढीला जनरल-झेड का म्हणतात?

जनरल-झेड या पिढीने आपले आयुष्य तंत्रज्ञान आणि आधुनिक उपकरणांसोबत सुरु केले आहे. त्यामुळे या लोकांना तंत्रज्ञानाचा राजा म्हटले जाते. या लोकांची सुरुवात तंत्रज्ञानापासून झाली होती. त्यामुळे या पिढीला जनरेशन-झेड म्हणतात.

कोणत्या वयोगटाला काय नाव आहे?

  • ग्रेटेस्ट जनरेशन – ग्रेटेस्ट जनरेशनमधये 1901 ते 1927 दरम्यान जन्मलेल्या लोकांचा समावेश आहे.
  • सायलेंट जनरेशन – सायलेंट जनरेशनमध्ये 1928 ते 1945 दरम्यान जन्मलेल्या लोकांचा समावेश आहे.
  • बेबी बूमर्स – बेबी बूमर्स पिढीमध्ये 1946 ते 1964 दरम्यान जन्मलेल्या लोकांचा समावेश आहे.
  • जनरेशन एक्स – जनरेशन एक्स पिढीमध्ये 1965 ते 1980 दरम्यान जन्मलेल्या लोकांचा समावेश आहे.
  • मिलेनिअल्स किंवा जनरेशन वाय – मिलेनिअल्स पिढीमध्ये 1981 -1996 दरम्यान जन्मलेल्या लोकांचा समावेश आहे.
  • जेन झी – जेन झी पिढीमध्ये 1997 ते 2012 दरम्यान जन्मलेल्या लोकांचा समावेश आहे.
  • जनरेशन अल्फा – जनरेशन अल्फा या पिढीमध्ये 2013 ते 2024 दरम्यान जन्मलेल्या लोकांचा समावेश आहे.
  • जनरेशन बीटा – जनरेशन बीटा या पिढीमध्ये 2025 -2039 दरम्यान जन्मलेल्या लोकांचा समावेश आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.