AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताची राष्ट्रीय भाषा कोणती? DMK खासदार कनिमोझी यांच्या उत्तरावर टाळ्यांचा कडकडाट, तुम्ही पण म्हणाल लाजबाब, Video पाहाच

DMK MP Kanimozhi Karunanidhi : राज्यात सध्या हिंदीविरोधी वातावरण आहे. हिंदीविषयीच्या सरकारच्या धोरणाविरोधात विरोधक एकवटले आहेत. मुंबईत मराठी विरुद्ध हिंदी, गुजराती असा वाद रंगला असताना डीएमकेच्या खासदार कनिमोझी यांनी सर्वांनाच अंतर्मुख करणारे उत्तर दिले आहे.

भारताची राष्ट्रीय भाषा कोणती? DMK खासदार कनिमोझी यांच्या उत्तरावर टाळ्यांचा कडकडाट, तुम्ही पण म्हणाल लाजबाब, Video पाहाच
भारताची राष्ट्रीय भाषा कोणती?Image Credit source: गुगल
| Updated on: Jun 28, 2025 | 11:46 AM
Share

इयत्ता पहिलीपासून हिंदी तिसरी भाषा म्हणून त्रिसूत्री भाषा धोरणाविरोधात विरोधकांनी शड्डू ठोकले आहेत. मुंबईत 5 जुलै रोजी हिंदी सक्तीविरोधात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. दक्षिणेतील राज्यातही हिंदीला नकारघंटा वाजवण्यात येत आहे. भाषिक वादाची हलगी वाजत असतानाच तामिळनाडूतील द्रविड मुनेत्र कळघम (DMK) या पक्षाच्या खासदार कनिमोझी करुणानिधी यांनी भारताची भाषा कोणती यावर एकदम खणखणीत उत्तर दिले. त्यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

टाळ्या काही थांबेचनात

भारताची राष्ट्रीय भाषा कोणती असा सवाल कनिमोझी यांना विचारण्यात आला होता. त्यांच्या उत्तराने सभागृहात टाळ्यांचा एकच गजर झाला. त्यांच्या चपखल उत्तराने उपस्थितांची मनं जिंकली. एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी जे उत्तर दिले, ते एकदम व्हायरल झाले. कनिमोझी यांना भारताची राष्ट्रीय भाषा कोणती असा सवाल विचारण्यात आला होता. ‘विविधतेत एकता ही भारताची राष्ट्रीय भाषा आहे’, असे उत्तर त्यांनी दिले.

त्यांच्या या उत्तराने उपस्थित लोकांची मनं जिंकली. त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्याविषयीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. देशातील दक्षिण आणि पश्चिम भागात हिंदी लादण्यात येत असल्याचा दावा विरोधक आणि भाषा प्रेमींकडून गेल्या काही वर्षात करण्यात येत आहे. महाराष्ट्रात तर हिंदी भाषा धोरणाविरोधात मुंबईत येत्या 5 जुलै रोजी मनसे आणि उद्धव सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि इतर अनेक पक्ष, संघटना एकत्र येत आहे. त्यांचा मोठा मोर्चा आहे. त्यावेळी कनिमोझी यांचे उत्तर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

सोशल मीडियावरील हा व्हिडिओ या महिन्याच्या सुरुवातीचा असल्याची माहिती समोर येत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला धूळ चारली. जगाला भारताची भूमिका समजावून सांगण्यासाठी आणि पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडण्यासाठी भारतीय खासदारांचे शिष्टमंडळ विविध देशात गेले होते. कनिमोझी या पण या शिष्टमंडळात होत्या. सध्या राज्यात हिंदी भाषेवरून वाद वाढला आहे. सरकारविरोधात विरोधक असा सामना रंगला आहे. त्यावेळी या व्हिडिओची पण चर्चा रंगली आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.